04 March 2021

News Flash

मोडून पडला संसार.!

महापालिकेने राजावली येथील बेकायदा चाळींवर कारवाई करत या चाळी जमीनदोस्त केल्या.

पालिकेच्या कारवाईनंतर शेकडो कुटुंबांचे बस्तान जमीनदोस्त चाळींच्या जागेवरच

महापालिकेने राजावली येथील बेकायदा चाळींवर कारवाई करत या चाळी जमीनदोस्त केल्या. मात्र संसार मोडून पडलेली शेकडो कुटुंबे येथून हटायला तयार नाहीत. ‘चाळमाफियांनी आम्हाला घरे विकली. पै पै करून आम्ही घरे विकत घेतली, यात आमचा काय दोष..’ असे येथील रहिवासी विचारत आहेत.

राजावली येथील चाळमाफियांनी बांधलेल्या चाळी बेकायदा ठरवत वसई-विरार महापालिकेने त्यांवर बुलडोझर फिरवला. हक्काचा निवाराच जमीनदोस्त झाल्याने बेघर झालेल्या येथील रहिवाशांनी त्याच ठिकाणी आपला संसार मांडला आहे. शाळेत जाऊन शिकायचे आहे, मात्र संसारच उघडय़ावर आल्याने येथील मुलांना शाळेत जाता येत नाही. डोक्यावर छप्परच नसल्याने उन्हाचे असह्य चटके सहन करून आम्हाला राहावे लागत आहे, अशी व्यथा येथील रहिवाशांनी माडली.

वसई-विरार महापालिकेने चाळी उभ्या होत असताना कारवाईच का केली नाही, असा सवाल येथील रहिवाशांनी विचारला. सरकारी जागा असताना तहसील आणि वनविभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे चाळमाफियांचे फावले. याला जबाबदार असणाऱ्यांनी आता कारवाई करून आता हात वर केले, परंतु येथील ५०० हून अधिक कुटुंबे बेघर झाली. मात्र त्याकडे कुणाचेच लक्ष नाही.

एकीकडे महापालिका प्रशासन महिलांचा सन्मान करते, मात्र येथे अनेक महिला आपल्या मुलाबाळांसह उघडय़ावर राहत आहे. त्यांच्याबाबतीत थोडाफार विचारही केला गेला नाही. घरे नसल्याने आम्हाला मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.                             – रामदास तिवारी, रहिवासी

कर्ज काढून, पै पै जमवून अनेकांनी घरे घेतली. सर्व पैसा घरासाठी वापरला, आता खिशात पैसेही नाही. आता आम्ही कुठे जायचे? नोटीसही न देता कारवाई करून आम्हाला बाहेर काढले.

शिव पांडे, रहिवासी

इतके दिवस प्रशासन निद्रावस्थेत होते का? गेल्या पाच वर्षांपासून येथे नागरिक राहत होते. आता अचानक प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी आम्हाला उघडय़ावर आणले.

उर्मिला कासारे, रहिवासी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 2:51 am

Web Title: action on illegal chawls by vasai virar municipal corporation
Next Stories
1 डॉक्टर, अभियंत्यांचे पोलीस शिपाईपदासाठी अर्ज
2 कचरा विल्हेवाटीचे तीनतेरा
3 नव्या ठाण्याची पायाभरणी
Just Now!
X