20 January 2021

News Flash

बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई

ठाणे, डोंबिवलीत दंडवसुली

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे/डोंबिवली : ठाणे तसेच डोंबिवली रेल्वे स्थानकातील रिक्षा थांबे सोडून इतरत्र रिक्षा उभ्या करून पादचाऱ्यांची वाट अडविणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या दोन्ही स्थानक परिसरांत पोलिसांनी कारवाई सुरू केली असून त्यामध्ये ठाण्यात ३२४, तर कल्याणमध्ये ७० रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सॅटिस पुलाखाली रिक्षासाठी थांबा आहे. या थांब्यावर रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांची वाहतूक करणे रिक्षाचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक रिक्षाचालक त्याकडे दुर्लक्ष करीत असून काही रिक्षाचालक थांबे सोडून स्थानक परिसरात इतरत्र उभे राहून प्रवाशांची वाट अडवितात. तसेच काही रिक्षाचालक जास्त भाडे आकारून प्रवाशांची लूटमार करतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ठाणे स्थानक परिसरात कारवाई सुरू केली. गुरुवारी सकाळी आणि रात्री पोलिसांनी कारवाई करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३२४ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली. या रिक्षाचालकांकडून ७५ हजार ६०० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.

७० रिक्षांवर कारवाई

डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे प्रवेशद्वारांसमोर दररोज ५० ते ६० रिक्षा उभ्या केल्या जातात. हे रिक्षाचालक रेल्वेचे प्रवेशद्वार, दोन्ही बाजूचे रस्ते अडवून प्रवासी वाहतूक करतात. तसेच रिक्षा रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या केल्या जात असल्याने परिसरात वाहतूक कोंडी होते. त्यांच्याविरोधात वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव यांनी गुरुवारी कारवाई सुरू केली. त्यात ६० ते ७० रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 2:21 am

Web Title: action taken on unruly rickshaw drivers dd70
Next Stories
1 बाजारपेठांना ‘लग्नसराई’चा साज
2 दोन महिन्यांत १०० कोटींची भर
3 महिला प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ
Just Now!
X