News Flash

तारांकीत : माझ्या नृत्यप्रेमाची मुहूर्तमेढ ठाण्यातच!

ठाण्यात स्वत:ची डान्स अ‍ॅकॅडमी चालविणारा नृत्यगुरू आणि नृत्यकार म्हणून ठाणेकरांना माहीत असलेला अभिनेता नकुल घाणेकर सध्या ‘जय मल्हार’ मालिकेतील प्रधानजी या भूमिकेद्वारे घराघरांत पोहोचला आहे.

| February 14, 2015 12:49 pm

ठाण्यात स्वत:ची डान्स अ‍ॅकॅडमी चालविणारा नृत्यगुरू आणि नृत्यकार म्हणून ठाणेकरांना माहीत असलेला अभिनेता नकुल घाणेकर सध्या ‘जय मल्हार’ मालिकेतील प्रधानजी या भूमिकेद्वारे घराघरांत पोहोचला आहे. यापूर्वी ‘अजूनही चांदरात आहे’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेद्वारे नकुल प्रेक्षकांसमोर आला होता. ‘संघर्ष’, ‘सामथ्र्य’ अशा दोन चित्रपटांत काम केले आहे. त्याशिवाय ‘तुजसाठी प्रिया रे’ नावाच्या नाटकातूनही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अभिनय आणि नृत्य पहिलं प्रेम असलेला नकुलविषयीचे हे ‘डिफरंट स्ट्रोक्स’..
* आवडता भारतीय नृत्यप्रकार – कथ्थक
* पाश्चात्त्य नृत्य प्रकार – साल्सा
*आवडते रंग – लाल आणि पांढरा
* आवडते मराठी चित्रपट – ‘देऊळ’, ‘गंध’
* आवडते नृत्य चित्रपट – ‘डान्स विथ मी’ हा साल्सा व लॅटिन नृत्य प्रकारावरचा चित्रपट आणि साल्सा फॅन्सनी आवर्जून पाहावा असा ‘डर्टी डान्सिंग’ हा जुना इंग्रजी चित्रपट. त्याशिवाय  ‘लम्हें’ या चित्रपटात सरोज खान यांनी केलेले नृत्यदिग्दर्शन यासाठी तो चित्रपट खूप आवडला.
* आवडते हिंदी चित्रपट – ‘कथा’,   ‘लम्हें’
* आवडती नाटकं – ‘बेचकी’, ‘गुरू’
* आवडते नृत्य कार्यक्रम – पं. राजेंद्र गंगाणी यांचे कथ्थक नृत्याचे कार्यक्रम तसेच दीपक मुझुमदार यांचे भरतनाटय़मचे नृत्य कार्यक्रम पाहून खूप प्रेरणा मिळाली, खूप शिकायला मिळालं.
* आवडते खाद्यपदार्थ – मासे पण त्यातही बोंबिल, तिसऱ्या, खेकडा, कोळंबी हे विशेष आवडतात.
* आवडतं शॉपिंगचं ठिकाण – गोखले रोड, राम मारुती रोडवरील दुकाने
* आवडतेफूडजॉइण्ट्स – शाळा-कॉलेजपासून गावदेवी येथील अमृता स्नॅक्स, गावदेवी येथील जोगदेव यांचे जनसेवा आइसक्रीमचे दुकान. त्याशिवाय सरस्वती सेकंडरी शाळेलगतचे ‘शांघाय’ हे चायनीज पदार्थासाठी विशेष आवडते. माझी डान्स अ‍ॅकॅडमी जिथे आहे त्याच्यानजीकचे गोखले उपाहारगृह खास आवडते.
* माझे नृत्य गुरू – सोनिया परचुरे यांचे परफॉर्मन्स, त्यांच्याकडे नृत्याचे धडे गिरविण्याची संधी मिळाली तसेच काही चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शनात त्यांना साहाय्य करण्याचीही संधी मिळाली. वयाच्या आठव्या वर्षी कथ्थक नृत्याचे शिक्षण देणारे डॉ. राजकुमार केतकर, तसेच पाश्चात्त्य शैलीचे नृत्य शिकविणारे गुरू राजेंद्र गमरे.
* नृत्य की अभिनय –  नृत्य अधिक नाटय़ अशी ‘नृत्य’ या शब्दाची फोड आहे. नृत्यात अभिनय हा अंगभूत-अंतर्भूत आहेच. त्यामुळे नृत्य की अभिनय यापैकी एकाची निवड करणे केवळ अशक्य.
* आवडते हॉटेल/ रेस्टॉरण्ट – मुलुंड चेकनाक्याजवळच लाल बहादूर शास्त्री मार्गावरचे ‘सिंधुदुर्ग ’ आणि तीन पेट्रोलपंपजवळचे ‘मी हाय कोळी.’
* ठाणे जिल्ह्य़ातील आवडता पिकनिक स्पॉट – नेरळजवळचे ‘सगुणा बाग’
* ठाणे शहरातील संस्मरणीय गोष्ट – वयाच्या सातव्या-आठव्या वर्षांपासून ठाण्यात नौपाडामध्ये राहतोय. आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यम शाळा, शाळेचे रम्य दिवस, नौपाडा-विष्णूनगर-भास्कर कॉलनीमधील छोटय़ा छोटय़ा गल्ल्यांमधून भटकणे, मित्रांसोबत खूप खेळणे या रम्य आठवणी माझ्याही आहेत. विशेष लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे माझे आई-बाबा परदेशी असताना साधारण सात-आठ वर्षांपूर्वी घराजवळच्या आयएसडी बूथवर इंटरनॅशनल कॉल करण्यासाठी गेलो होतो. फोन करून निघताना त्या दुकानात माझा तेव्हा जवळपास २०-२२ हजार रुपयांचा मोबाइल विसरलो होतो. घरी आल्यावर लगेचच लक्षात आले आणि त्या दुकानात गेलो तेव्हा मोबाइल नव्हता. चोरीला गेला होता. लगेच आमच्या नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. एक हवालदार माझ्यासोबत त्वरित आले आणि त्यांनी दुकानदाराकडे चौकशी केली. तेवढय़ा कालावधीत सात-आठ वर्षांपूर्वीच्या नौपाडा परिसरात नकुल पोलिसांना घेऊन आला ही बातमी पसरली होती. चोर करणारा मुलगाही परिसरातीलच असावा, असा सरळ अंदाज होता. चौकशीअंती तो मुलगा सापडला, त्याने मोबाइल मला परत केला आणि त्याला घेऊन मी पुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात गेलो. त्याने चोरी केल्याचे कबूल केले वगैरे सगळ्या गोष्टी सकाळी एक-दोन तासांत घडल्या, पोलिसांनी भराभर निर्णय घेऊन लगेच मोबाइल चोर शोधून दिला. माझा तेव्हाचा महागडा असलेला मोबाइल हरवल्यामुळे झालेली अवस्था आता शब्दांत वर्णन करता येणार नाही. परंतु, नौपाडा पोलिसांनी केलेली मदत विसरता येणार नाही. सात-आठ वर्षांपूर्वीचं ठाणे शहर, नौपाडा परिसरात जवळपास सर्वच जण एकमेकांना चांगले ओळखत असत, आजही ओळखतात. त्या अर्थाने ठाणे शहर विस्तारले असले तरी अजून ‘डाऊनटाऊन’ म्हणता येईल तसे झालेले नाही. हे खूप छान आहे असं वाटतं. एकमेकांना सगळे ओळखतात हा मुंबई-ठाण्यातला फरक निश्चित आहे. किंबहुना हेच ठाणे शहराचं वैशिष्टय़ म्हणता येईल.
संकलन : सुनील नांदगावकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 12:49 pm

Web Title: actor nakul ghanekar
Next Stories
1 खाऊखुशाल : जन्याकाकांची खुसखुशीत कचोरी
2 तिरका डोळा : उपवनचे अरण्यरुदन!
3 जिल्हा नियोजनात सरपंचांचाही सहभाग
Just Now!
X