‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मधील दुकानांत उपस्थिती

ठाणे : खरेदीसोबत आकर्षक बक्षिसेजिंकण्याची संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’चे शेवटचे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या दुकानांना अभिनेत्री विदिशा म्हसकर ही गुरुवारी भेटी देणार असून त्यामुळे तिला भेटण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे.

LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
Sanjay Singh
नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

महोत्सवात सहभागी झालेल्या राम मारुती रोड येथील रतांशी खेराज सारीज, तीन हात नाका येथील हॉटेल टिप टॉप, गोखले रोड येथील पॅरागॉन, घोडबंदर दोस्ती इंपेरीया येथील सरलाज् या दुकानांना ती भेट देणार आहे.

पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या निमित्ताने ग्राहकांना विविध सिने कलाकांराना भेटण्याची संधी मिळत आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत सान्वी हे पात्र साकारणारी अभिनेत्री विधिशा म्हसकर ही गुरुवारी सायंकाळी ५ वाजता महोत्सवात उपस्थिती लावणार आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या दुकानांना ती भेटी देणार असून त्या वेळी तिला भेटण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे. रविवार, १६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येत असून एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअरकंडिशनर, रेफ्रिजरेटर अशा भेटवस्तूंसह गिफ्ट व्हाऊचर आणि मोबाइल अ‍ॅक्सेसरीज् अशा आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहेत. फेस्टिव्हलच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्यास कार आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सहलीचे पॅकेज अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

प्रायोजक

पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा  रिजन्सी ग्रुप आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत आहे. तन्वी, ऑर्बिट, टिप टॉप मिठाईवाला, मे. पांडुरंग हरी वैद्य आणि कंपनी ज्वेलर्स  हे या महोत्सवाचे असोसिएट पार्टनर आहेत. तर बंधन टुरिझम हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. रतांशी खेराज सारीज, जीन्स जंक्शन, द रेमंड शॉप, शुभकन्या, अशोक स्वीट्स, दैनिक मालवणी, अनंत हलवाई, मॅपल्स सलून आणि स्पा हे या महोत्सवाचे पॉवर्ड बाय प्रायोजक असून डीजी ठाणे हे महोत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तर या महोत्सवाचे खवय्ये रेस्टॉरन्ट हे फूड पार्टनर, परंपरा हे स्टायलिंग पार्टनर, वोरटेक्स हे वायफाय पार्टनर, डय़ुरेन फर्निचर हे कम्फर्ट पार्टनर, गोल्डन अ‍ॅप्लायन्सेस हे होम अ‍ॅप्लायन्सेस पार्टनर, रिट्झ बँक्वेट्स हे बँक्वेट पार्टनर आणि सरलाज् हे ब्युटी पार्टनर आहेत. तर कलानिधी हे या महोत्सवाचे गिफ्ट पार्टनर आहेत.

सुप्रिया पाठारे यांची डोंबिवलीत उपस्थिती

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे या गुरुवारी ठाणे शॉपिंग फेस्टिवलच्या निमित्ताने दुपारी ४ वाजता डोंबिवली पूर्वेतील विको नाका येथील रिजन्सी अनंतम्ला भेट देणार आहेत. या वेळी डोंबिवलीकरांना सुप्रिया पाठारे यांना भेटण्याची संधी मिळणार आहे.