11 August 2020

News Flash

आधारवाडी कचराभूमी दीड वर्षांत बंद!

कल्याणमधील आधारवाडी परिसरातील नागरिकांची दीड वर्षांत या तापातून सुटका होण्याची शक्यता आहे.

कल्याण, डोंबिवलीचे महापौर आणि पालिका आयुक्त यांनी सोमवारी आधारवाडी परिसराची पाहणी करून स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

कल्याण, डोंबिवलीचे महापौर, पालिका आयुक्तांचा स्थानिकांना दिलासा
वारंवार लागणाऱ्या आगी, त्या धुरामुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न, दररोजच्या दरुगधीचा त्रास अशा वातावरणात दिवस कंठत असलेल्या कल्याणमधील आधारवाडी परिसरातील नागरिकांची दीड वर्षांत या तापातून सुटका होण्याची शक्यता आहे. आधारवाडी येथील कचरा भूमी येत्या दीड वर्षांत कायमची बंद करण्याची घोषणा सोमवारी महापालिका आयुक्त ई.रवींद्रन यांनी केली. ही कचरा भूमी टप्प्याटप्प्याने बंद केली जाणार असून कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत तब्बल पाच ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. बारावे, उंबर्डे, मांडा, डोंबिवलीलगतचा २७ गावांचा परिसर आणि याच भागात अन्य एका ठिकाणचा शोध त्यासाठी घेण्यात आला आहे, असेही आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, आधारवाडी कचरा भूमीवर लागणाऱ्या आगीचा तपास करण्यासाठी समिती नेमली जाणार असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी या वेळी पत्रकारांना दिली. चौकशीत काही संशयास्पद हालचाली आढळल्यास पुढील गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया तातडीने उरकली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कल्याण परिसरातील रहिवाशांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महापौर आणि आयुक्तांनी सोमवारी सकाळी आधारवाडी कचरा भूमीचा संयुक्त दौरा केला. ‘कचराभूमीवरील आग आटोक्यात आली आहे. त्यामुळे धुराचाही त्रास नागरिकांना होणार नाही. पावसाळ्यात कचऱ्याला दरुगधी सटू नये यासाठी एका विशिष्ट रसायनाची फवारणी केली जाणार आहे,’ असे महापौरांनी या वेळी सांगितले. तर आधारवाडी कचराभूमी पुढील दीड वर्षांत बंद करण्याचे ठरविण्यात आले आहे, असे आयुक्तांनी सांगितले. यासंबंधीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून राज्य सरकारच्या परवानगीस अधीन लावून पढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. उंबर्डे, बारावे, मांडा टिटवाळा, कल्याण पूर्व व डोंबिवली ग्रामीण भागात बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करून तेथेच शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2016 2:51 am

Web Title: adharwadi dumping ground will closed in 18 month
Next Stories
1 वणवे रोखा!
2 सेंद्रीय शेतीतून कैद्यांची लाखमोलाची कमाई
3 चारित्र्याच्या संशयावरून तुंगारेश्वरमध्ये पत्नीची हत्या
Just Now!
X