01 March 2021

News Flash

दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रशासकीय प्रयत्न

दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर न झालेल्या तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी पीककापणी प्रयोग राबवण्यात आले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

गावांमध्ये पुन्हा पीककापणी प्रयोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

यंदाच्या मान्सून हंगामात झालेल्या भातपिकाचे नुकसान ठरवण्यासाठी करण्यात आलेले पीककापण प्रयोगाचे अहवाल वास्तवाशी सुसंगत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमध्ये पिकांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पीककापणी प्रयोग आणि पैसेवारी ठरवण्याचे निकष पुन्हा तपासून घेण्याचे निर्देश पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.

केंद्र शासनाने दिलेल्या निकषानुसार पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड, तलासरी व पालघर या तीन तालुक्यांना प्रथम दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर राज्यांमधील मंडळनिहाय केलेल्या पाऊसमानाच्या सर्वेक्षणामध्ये पालघर जिल्ह्यातील एकही मंडळ दुष्काळग्रस्तांच्या यादीमध्ये समावेश होऊ शकले नव्हते.

दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर न झालेल्या तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी पीककापणी प्रयोग राबवण्यात आले आहेत, तसेच पिकाची पैसेवारी काढण्यात आली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रत्यक्षामध्ये ३० ते ४० टक्के पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले असताना पैसेवारीचे आकडे वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर जिल्ह्यातील दुष्काळप्रवण भागात पीककापणी प्रयोग पुन्हा राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. या प्रयोगाच्या वेळी महसूल व कृषी विभागाच्या प्रतिनिधींसोबत स्थानिक शेतकऱ्यांसोबत घेण्याचे सूचना जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून नजर पैसेवारीचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होत असून त्याचा आधार घेऊन बाधित गावांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पाच तालुक्यांत दुष्काळ जाहीर नाही

यंदाच्या वर्षी खरिपातील भातशेतीचे मोठय़ा प्रमाणामध्ये नुकसान झाले असून भाताचा दाणा पुरेशा प्रमाणामध्ये भरला गेला नाही. काही ठिकाणी भाताचे फक्त पळिंज शेतकऱ्यांच्या हाती लागत असून पाण्याच्या अभावामुळे भात पिके खुंटल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. असे असताना पालघर जिल्ह्यात सर्वत्र सरासरीच्या जवळपास पाऊस झाल्याने शासनाच्या प्राथमिक निकषानुसार जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अजूनही दुष्काळ घोषित करण्यात आला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 12:40 am

Web Title: administrative efforts to declare drought
Next Stories
1 पालघरमध्ये हिरवा; ठाण्यात लाल कंदील!
2 हरिश्चंद्रगड येथे कल्याणचे 20 ट्रेकर्स अडकले
3 रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक
Just Now!
X