मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे हे महाराष्ट्र जाणतो. रविवारी पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात राज ठाकरे, अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जलसंधारणाच्या मुद्द्यावरून दावे प्रतिदावे बघायला मिळाले. राज ठाकरेंना उत्तर देताना अजितदादा काहीसे चिडल्याचे दिसून आले. यावरच बोलताना राज ठाकरे म्हटले की अहो अजितदादा एवढे मनाला लावून घेऊ नका. मी अजित दादांना उद्देशून बोललो नव्हतो., १९६० पासून जे घडते आहे त्याबद्दल बोललो होतो असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

पाणी फाऊंडेशनच्या कामामुळे जल संधारण होऊ शकते तर मग इतक्या वर्षात जलसंधारणाचा पैसा कुठे मुरला? असा प्रश्न राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात उपस्थित केला. ज्यावर उत्तर देताना अजित पवार म्हटले की काही लोक बोलघेवड्यासारखे बोलतात त्यांना फक्त त्यावरच सभा जिंकून घ्यायची असते. तर मुख्यमंत्री म्हटले की पाणी अडवा पाणी जिरवा ऐवजी माणसे अडवा आणि त्यांची जिरवा हे धोरण राबवले गेले त्यामुळेच जलसंधारण होऊ शकले नाही असे उत्तर दिले.

पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला मी बसलो होतो तेव्हा माझ्या उजव्या बाजूने जो आवाज आला की आमिर खानने पाणी फाऊंडेशनच्या माध्यातून चांगली कामे केली आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही गोष्ट मला सांगितली. जर लोक सहभागातून कामं होणार असतील तर मग सरकारचे काम काय?. १ लाख २० हजार विहिरी बांधल्या त्या जर लोकसहभागातून बांधल्या तर मग तुमचे अधिकारी काय करत आहेत? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थितीत केला. सरकारी अधिकारी आमिर खान साठी काम करत आहेत का?, असा संशय उपस्थितीत करत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अपयश आमिर खानच्या आड लपवू नये असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.