ठाणे येथील साकेत परिसरात कोकेन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन जणांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी अटक केली असून या दोघांच्या चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबईतील बांगुरनगर भागात राहणाऱ्या यास्मीन नईम खान (३५) या महिलेच्या घरातून एके ५६ बंदूक जप्त केली आहे. याप्रकरणी तिला पोलिसांनी अटक केली असून ती कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या टोळीचा सदस्य असलेल्या नईम फईम खान याची पत्नी असल्याची बाब तपासात समोर आली आहे.

ठाण्यातील साकेत भागात कोकीन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन जणांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी अटक केली आहे. जाहीद काश्मिरी (४७)आणि संजय बिपिन श्रॉफ (४७) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.