ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणातील चारही नगरसेवक आरोपींच्या जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने शनिवारी नामंजूर केले. यामुळे चारही आरोपी आता जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सुत्रांकडून समजते.
सुरज परमार यांनी आत्महत्यापुर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये नगरसेवक हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण यांची नावे पुढे आली होती. त्याआधारे पोलिसांनी चौघांवर अटकेची कारवाई केली असून सध्या हे चौघे न्यायालयीन कोठडीत असल्याने ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदीस्त आहेत. या प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी चौघांनी ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केले होते. न्यायाधीश बांबर्डे यांनी चौघांचे जामीन अर्ज नामंजूर केले.