News Flash

ठाण्यातही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद, वाईनशॉप्सही बंद

ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी हे आदेश दिले आहेत

(संग्रहित छायाचित्र)

ठाण्यातही अत्यावश्यक सेवा म्हणजे दूध डेअरी, किराणा मालाची दुकानं आणि मेडिकल्स हे वगळता सर्व दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाईनशॉप्सही बंद करण्यात आली आहे. लॉकडाउनच्या काळात दुकानं उघडण्याची मुभा दिली तरीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने शहरातील संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी हे आदेश दिले आहेत.

करोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून एका रस्त्यावर पाच बिगर आवश्यक दुकानं सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र ही संमती दिली असताना लोक या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे दिसून आले. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन होत नसल्याचीही बाब समोर आली. तसेच यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं (वाईन शॉप्ससह) बंद करण्याचा निर्णय झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 8:51 pm

Web Title: all shops are closed except for essential services and wine shops are also closed in thane scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दुकाने बंद, बिले भरमसाठ
2 ठाण्यात ११३ ठिकाणे प्रतिबंधित
3 ठाण्यात सुसज्ज इमारतींमध्ये कोविड रुग्णालय
Just Now!
X