29 September 2020

News Flash

वसईत स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन

पक्षीगणनेत ६७ विविध प्रजातींची नोंद

पक्षीगणनेत ६७ विविध प्रजातींची नोंद

वसईत थंडीचे आगमन झाले नसले तरी हिवाळाच्या मोसमात स्थलांतर करून येणाऱ्या विविध पक्ष्यांनी मात्र वसईत दाखल होण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षक आणि अभ्यासकही निरीक्षणासाठी सज्ज झाले आहे. पक्षी मित्रांनी केलेल्या निरीक्षणात वसईत ६७ विविध प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांची नोंद झालेली आहे. त्यात प्रवासी पक्षी, निवासी पक्षी आदींचा समावेश आहे.

वसईच्या निसर्गरम्य वातावरणात अनेक पक्ष्यांचा संचार असतो. दरवर्षी हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्षी वसईत येत असतात. त्यामुळे हा काळ पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी ठरत असतो. वसईतील स्थलांतरित पक्ष्यांच्या अभ्यास करण्यासाठी नेस्ट या संस्थेने भुईगाव समुद्रकिनारी पक्षीगणना केली.

हिवाळ्याची सुरुवात म्हणजे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचा काळ. सामान्य जनतेमध्ये पर्यावरण जागृती आणि पक्ष्यांच्या अद्भुत दुनियेची ओळख व्हावी या हेतूने हे निरीक्षण केल्याचे पक्षीमित्र अमोल लोपीस यांनी सांगितले. तुतवार, कुररी, केगो यांच्या प्रजाती, रुडी टर्नस्टोन यांसारखे समुद्रकिनाऱ्यांवर आढळणाऱ्या पक्ष्यांच्या ६७ पक्षी प्रजातींच्या नोंदी घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पक्षीगणनेत आढळलेले पक्षी

गल, चिलखे, तुताऱ्या, दगडी गप्पीदास, युरेशियन कल्र्यू, व्हिम्बरेल, ऑईस्टर केचर, उघड चोच करकोचा, रंगीत करकोचा, हुदहुद्या, तुताऱ्या, गरुड, ससाणे, घार , खंडय़ा, बगळे, राखी बगळे, लाजरी पाणकोंबडी, शराटी , शेकाटे, पाणकावळे,  घार , शिक्रा, वटवटय़ा, दगडी गप्पीदास, तुतारी, सुरय, महाभृंगराज, कोकीळ, मैना, चिमणी, भारद्वाज, हळद्या, दयाळ, तांबट.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 1:29 am

Web Title: amazing birds in vasai
Next Stories
1 ‘केळवे बीच फेस्टिव्हल’मध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल
2 मानीव अभिहस्तांतरणाचे भिजत घोंगडे
3 रस्ता रुंदीकरणामुळे पाणीटंचाई
Just Now!
X