18 January 2019

News Flash

अंबरनाथमध्ये अग्नितांडव; अवघ्या काही मिनिटांत कंपनी जळून खाक

अंबरनाथमध्ये कल्याण- बदलापूर महामार्गावर महावीर सेल्स ही प्लास्टिकच्या खुर्च्या तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीत शुक्रवारी रात्री भीषण आग लागली.

आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (छाया सौजन्य: दीपक जोशी)

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये शुक्रवारी रात्री प्लास्टिकच्या खुर्च्या तयार करणाऱ्या कंपनीत भीषण आग लागली. या आगीत जीवितहानी झालेली नसली तरी अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली.

अंबरनाथमध्ये कल्याण- बदलापूर महामार्गावर महावीर सेल्स ही प्लास्टिकच्या खुर्च्या तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीत शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. आगी इतकी भीषण होती की अवघ्या काही मिनिटांमध्ये कंपनी जळून खाक झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

छाया सौजन्य:दीपक जोशी

First Published on May 12, 2018 7:59 am

Web Title: ambarnath fire in plastic company no casualties reported