अंबरनाथ शहरातील पालिका प्रशासन सध्या अतिक्रमणांसाठी कर्दनकाळ ठरत असून अनेक बांधकामे पालिका व तहसिलदार कार्यालयाकडून जमीनदोस्त करण्यात आली आहेत. परंतु, येथील सूर्योदय सोसायटीच्या जागेतच पालिकेने अतिक्रमण करत उद्यान बांधल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे पालिकेनेच खासगी जागेत अतिक्रमण केल्याची चर्चा सध्या शहरात होत आहे.
सूर्योदय सोसायटी शहरातील सर्वात मोठी सोसायटी असून येथील जागांच्या खरेदी व विक्रीच्या व्यवहारांवर स्थगिती आणल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ही सोसायटी चर्चेत आहे. जवळपास १०२ एकरांच्या परिसरात येथे ६३० प्लॉट्स असून या सोसायटीच्या पूर्व भागात सोसायटीच्या परवानगीशिवाय अंबरनाथ पालिकेने उद्यान, सिमेंट ट्रॅक, खेळणी बसविल्याचे उघडकीस आले आहे. जवळपास ३० लाखांचा खर्च या उद्यानाचा पालिकेच्यावतीने करण्यात येणार असून काम सुरू असल्याचे समजते आहे. परंतु, हा भूखंड सोसायटीत असल्याने येथे उद्यान पालिका कसे बांधते? असा मुद्दा काही जण व्यक्त करत आहेत. तसेच सोसायटीच्या जागेत पालिकेच्या उद्यानाचे काम करता येणार नसल्याचे पत्र खुद्द तहसिलदार अमित सानप यांनी दिले असूनही येथे काम सुरू असल्याचे कळते आहे. यावरून पालिकेने तहसिलदारांच्या पत्राला वाटाण्याच्या अक्षता लावल्याची चर्चा नागरिकाममध्ये होत आहे.
सोसायटी भूखंडांच्या मुद्दय़ावरून गेले अनेक वर्षे समस्या झेलत असून या अनधिकृत उद्यानाच्या बांधकामाविरोधात सोसायटी न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे कळते आहे. त्यामुळे अंबरनाथ पालिकेच्या या उद्यानामुळे पालिका एककडी अनधिकृत बांधकामे पाडत असताना, खासगी जागेत अतिक्रमण करून प्रकल्प उभे करत असल्याचे बोलले जात आहे.
हा भूखंड सोसायटीने पालिकेला हस्तांतरीत केला आहे. तसेच या परिसरातील सर्व रस्ते हे पालिकाच करते. तरीही या भूखंडाबाबत कायदेशीर माहिती घेण्यासाठी नगररचना विभागाला कळवले आहे.
– सुहास सावंत,
पालिकेचे मुख्य अभियंता

flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Leopard Vasai Fort
वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन, वनविभागाची कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु
Encroachment by Navi Mumbai mnc
पालिकेकडूनच अतिक्रमण, वाशी सेक्टर १४ मध्ये पदपथावर कंटेनर हजेरी कार्यालय