News Flash

अंबरनाथमधील दंत महाविद्यालयावर गुन्हा धनादेश बाऊन्स झाल्याप्रकरणी कारवाई

अंबरनाथमधील शान एज्युकेशन सोसायटीच्या वादग्रस्त ठरलेल्या गार्डियन दंत महाविद्यालयावर शासनाने ठोठावलेल्या दंडापैकी एकूण २० लाख रुपयांचे सर्व धनादेश बाऊन्स केल्याप्रकरणी दंत महाविद्यालयाच्या अफान शेख याच्यावर

| June 1, 2015 03:06 am

अंबरनाथमधील शान एज्युकेशन सोसायटीच्या वादग्रस्त ठरलेल्या गार्डियन दंत महाविद्यालयावर शासनाने ठोठावलेल्या दंडापैकी एकूण २० लाख रुपयांचे सर्व धनादेश बाऊन्स केल्याप्रकरणी दंत महाविद्यालयाच्या अफान शेख याच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ पश्चिमेकडील चिखलोली परिसरातील गार्डियन दंत महाविद्यालय गेले काही दिवस तेथील अनियमिततेमुळे चर्चेत आले असून महाविद्यालयाने २०११-१२ साली शासनाची परवानगी नसतानाही ५५ विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना इतर परीक्षा केंद्रावरून परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
याबाबत शासनाने महाविद्यालयाला प्रत्येक विद्यार्थ्यांमागे १ लाख रुपये दंड ठोठावला होता. मात्र शासनाच्या वारंवार नोटिसा प्राप्त होऊनदेखील महाविद्यालयाने हा दंड भरला नव्हता. अखेर महाविद्यालयाने वेगवेगळ्या रकमांचे २० लाख रुपयांचे धनादेश अंबरनाथच्या तहसीलदारांकडे जमा केले होते. परंतु हे धनादेश बॅंकेत वटविण्यासाठी टाकले असता ते बाऊन्स झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 3:06 am

Web Title: ambernath dental college cheque bounce case
Next Stories
1 अंबरनाथमध्ये पुन्हा अतिक्रमणांवर हातोडा
2 जव्हारमध्ये ‘स्वदेस’ साकार!
3 कल्याणमध्ये आजपासून प्रीपेड रिक्षा सेवा
Just Now!
X