News Flash

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग

अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून आगीमुळे परिसरात धूराचे लोट पसरले आहेत.

अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण आग

अंबरनाथमधील मोरीवली एमआयडीसी येथे एका केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी पोहोचले असून आगीमुळे परिसरात धूराचे लोट पसरले आहेत.

मोरीवली एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी भीषण आग लागली असून या आगीमुळे परिसरात धूराचे लोट पसरले आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू  आहेत.

प्रेशिया केमिकल्स असे या कंपनीचे नाव असून आग लागताच कंपनीतील सर्व कामगार वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार १३ कामगार कंपनीत काम करत होते. आगीमुळे कंपनीतून स्फोटांचा आवाजही येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 3:25 pm

Web Title: ambernath morivali midc fire breaks out in chemical factory fire tender on spot
Next Stories
1 ठाण्यातील कामगार हॉस्पिटलमध्ये आग
2 माहिती अधिकार गैरप्रकारांचा ठाण्यातील नेत्यांना धसका
3 कल्याणमध्ये सूर आणि रोषणाईचा उत्सव
Just Now!
X