23 September 2020

News Flash

महिला-बालकल्याण विभागाकडे अंबरनाथ नगरपालिकेचे दुर्लक्ष

अंबरनाथ नगरपालिकेने शहरातील महिला व बाल कल्याणाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे उघड होऊ लागले आहे.

| August 27, 2015 12:33 pm

अंबरनाथ नगरपालिकेने शहरातील महिला व बाल कल्याणाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे उघड होऊ लागले आहे. नगरपालिका हद्दीतील गरजू, गरीब आणि समाजातील वंचित महिलांसाठी व बालकांसाठी पालिकेच्या आर्थिक निधीपैकी ५ टक्के निधी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. असे असताना बाल-कल्याण विभागामार्फत २०१४-१५ या आर्थिक वर्षांत राखीव असलेल्या एक कोटी ६५ लाख रुपयांच्या निधीपैकी केवळ साडेआठ लाख रुपये उपक्रमांवर खर्च करण्यात आले आहेत. आर्थिक वर्षांत मंजूर करण्यात आलेला निधी महिलांसाठीच्या योजना, उपक्रम, स्वयंरोजगार निर्माण करणे, व्यवसायिक प्रशिक्षण देणे, विद्याíथनींना शिष्यवृत्ती देणे, महिलांचे आरोग्य समुपदेशन आदींसाठी खर्च होणे अपेक्षित होते. मात्र यासाठी अल्प निधीच खर्च झाला आहे.नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत २०१५-१६ या आर्थिक वर्षांसाठी पुन्हा दीड कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, मागील वर्षी राखीव ठेवण्यात आलेला निधी अद्याप खर्च झाला नसताना नवी तरतूद करून काय उपयोग, असा सवाल उपस्थित केला जात आहे.’राखीव ठेवण्यात आलेल्या एक कोटी ६५ लाखांपैकी महिला आणि बालदिनासाठी ३० लाख, जयंती कार्यक्रमांसाठी ७ लाख, गरोदर आणि अपंग महिलांसाठी १० लाख, महिला नगरसेवकांच्या प्रशिक्षणासाठी १० लाख, शालेय आणि अंगणवाडी वैद्यकीय तपासणीसाठी ११ लाख आणि इतर खर्चासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.असे असताना महिला बाल कल्याण विभागाकडून महिला बाल दिन तसेच जयंती कार्यक्रमासाठी १४ हजार, गरोदर आणि अपंग महिलांसाठी ७५ हजार, व्यक्तिमत्त्व विकासासाठी साडेसात लाख आणि इतर असा ४ हजार खर्च करण्यात आला आहे. हा एकूण खर्च साडेआठ लाख रुपये आहे.

महिला विकासाची केवळ आश्वासने
निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांच्या बडय़ा नेत्यांनी व उमेदवारांनी महिला विकासाची आश्वासने दिली होती. मात्र, विकास करण्यासाठीचा निधीच वापरला जात नसल्याने निवडणुकांमधील घोषणा या तथ्यहीन असल्याचे समोर आले आहे. नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी राजेंद्र पांढरपट्टे यांनी मात्र निधी पडून नसून त्याचे सभेत ठराव संमत झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 12:33 pm

Web Title: ambernath municipality ignore women and child welfare department
Next Stories
1 ठाण्यातील आठवडा बाजार सुरूच!
2 शिक्षकांना ३० टक्के घरभाडे भत्ता देण्याची मागणी
3 नक्षलवाद्यांच्या तावडीतून गावकऱ्यांची सुटका
Just Now!
X