जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १ हजार ३९२ नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ३६ हजार ४२९ झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात २४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ३ हजार ७७५ वर पोहोचली आहे.
मंगळवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील ४०५, नवी मुंबईतील २६५, ठाणे शहरातील २५७, मीरा-भाईंदरमधील १७६, ठाणे ग्रामीणमधील १७०, बदलापूर शहरातील ३८, उल्हासनगर शहरातील ३२, अंबरनाथ शहरातील ३१ आणि भिवंडी शहरातील १८ रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी जिल्ह्य़ात २४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये कल्याण डोंबिवलीतील ७, ठाणे शहरातील ४, उल्हासनगर शहरातील ३, अंबरनाथ शहरातील ३, नवी मुंबईतील २, भिवंडी शहरातील २, ठाणे ग्रामीणमधील २ आणि मीरा-भाईंदरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 9, 2020 12:29 am