27 January 2021

News Flash

ठाणे जिल्ह्यात आणखी ९८४ रुग्ण; दिवसभरात ३१ जणांचा मृत्यू

मृतांची एकूण संख्या ३ हजार १०७ वर पोहोचली आहे

संग्रहित छायाचित्र

जिल्ह्य़ात मंगळवारी ९८४ करोनाबाधितांची नोंद झाल्याने जिल्ह्य़ातील करोनारुग्णांची एकूण संख्या १ लाख ८ हजार ५३२ इतकी झाली आहे. तर, मंगळवारी जिल्ह्यात ३१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ३ हजार १०७ वर पोहोचली आहे.

आठवडय़ाभरापासून करोना रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. मंगळवारी जिल्ह्यात ९८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये नवी मुंबईतील ३३३, कल्याण-डोंबिवली शहरातील २००, मीरा-भाईंदरमधील १६३, ठाणे शहरातील १४४, बदलापूर शहरातील ५६, ठाणे ग्रामीणमधील ३७, उल्हासनगर शहरातील २४, अंबरनाथ शहरातील १८ आणि भिवंडीतील ९ रुग्णांचा समावेश आहे. तर, मंगळवारी मृत्यू झालेल्यांत कल्याण डोंबिवलीतील ८, ठाणे शहरातील ७, उल्हासनगर शहरातील ५, नवी मुंबईतील ४, ठाणे ग्रामीणमधील ३, भिवंडीतील २ तर अंबरनाथ आणि मीरा-भाईंदरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2020 12:29 am

Web Title: another 984 patients in thane district abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 महिन्याभरात १९ मांजरींची विष देऊन हत्या
2 दीड वर्षांत ५४४ आगीच्या दुर्घटना
3 जाळे फाडा, पण दुर्मीळ सागरी प्रजातींना समुद्रात सोडा!
Just Now!
X