05 March 2021

News Flash

वृत्तपत्र ग्राहकांसाठी सुविधा अ‍ॅपचा ठाण्यात शुभारंभ

वन वॉलेट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

ग्राहकांना वितरित केलेल्या वृत्तपत्राचे बिल वेळेत ग्राहकांपर्यंत पोहचावे तसेच कागदोपत्री होणारा व्यवहार डिजिटल होऊन जलद व्हावा याकरिता वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या न्यूजपेपर प्रो अ‍ॅपचा शुभारंभ नुकताच ठाण्यात संपन्न झाला. वन वॉलेट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांकडे असणाऱ्या ग्राहकांची संपूर्ण माहिती, वृत्तपत्र बिल, ऑनलाईन बिल भरण्याची सुविधा या अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांचा दैनंदिन व्यवहार सुखकर होण्यास मदत होणार आहे. ग्राहकांची नोंदणी करणे, बिल तयार करणे, वृत्तपत्र वितरण सुविधा बंद करणे यासारख्या सोयी अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वेळेची बचत होणार आहे, असे वन वॉलेट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज तिवारी यांनी सांगितले. वृत्तपत्र आणि ग्राहक यांच्या दैनंदिन व्यवहारासाठी उपयुक्त ठरणारे न्यूजपेपर प्रो अ‍ॅप भ्रमणध्वनीवर डाऊनलोड करता येऊ शकते. एसएमएस किंवा ईमेलच्या माध्यमातून ग्राहकांचे बिल पाठवता येणार आहे. ग्राहकांची माहिती ठेवण्यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांना कागदोपत्री व्यवहार करावा लागत होता. या अ‍ॅपच्या साहाय्याने विक्रेत्यांना हवी असलेली माहिती काही क्षणात उपलब्ध होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 1:23 am

Web Title: app for news paper features
Next Stories
1 बदलापूरात नाल्यांवर अतिक्रमण
2 डोंबिवलीत ५५ शोषखड्डे
3 लोकमानस : ‘बेस्ट’चं काय चाललंय ‘राव’?
Just Now!
X