News Flash

भातुकलीच्या खेळामधली..

मोठय़ांच्या बालपणातील ते सोनेरी क्षण आता आठवणीत उरले आहेत.

मातीच्या चुली, भांडी, झाडाच्या पानांची खोटीखोटी भाजी, बाहुला-बाहुलीचे लग्न हा भातुकलीचा डाव गेल्या काही वर्षांत हद्दपार झाला आहे. मोठय़ांच्या बालपणातील ते सोनेरी क्षण आता आठवणीत उरले आहेत. बदलत्या काळानुसार स्वयंपाकघर जसं आधुनिक होत गेलं, तर भातुकलीचा डावही ‘मॉडय़ुलर’ बनत गेला. पूर्वी मैत्रिणी एकत्र जमून सर्वाची मोजकी भांडी एकत्र करून हा खेळ खेळत असत, परंतु आता मुली एकटय़ाच त्यांच्या आधुनिक किचनमध्ये रमताना दिसतात. पूर्वीची खेळातील आपुलकी, सर्वाना सामावून घेत खेळ खेळण्याची ती मज्जा या सर्व आठवणी पुन्हा एकदा जागवायच्या असतील तर डोंबिवलीतील टिळक रोडवरील सुयोग मंगल कार्यालयात नक्की भेट द्या. टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून भातुकलीचे प्रदर्शनच भरवण्यात आले आहे. मातीची भांडी, चूल, स्टोव्ह, इवलुशी परात, बाहुला-बाहुली अशा अनेक गोष्टी येथे पाहायला मिळतील. शनिवापर्यंत सुरू असणारे हे प्रदर्शन सर्वासाठी खुले आहे.

’कधी- शनिवार, २६ सप्टेंबपर्यंत. वेळ-सकाळी १० ते रात्री १०
’कुठे- सुयोग मंगल कार्यालय, पहिला मजला, टिळक रोड, डोंबिवली (पू.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 7:48 am

Web Title: appliance of children
टॅग : Children
Next Stories
1 ‘मुंबई साप्ताहिकी’ अंधांनाही अनुभवता येईल असे अनोखे चित्रप्रदर्शन
2 ‘निर्वासितांच्या शहरा’ला विकासाची आस
3 उल्हासनगरचा विकास अपेक्षित
Just Now!
X