News Flash

पाऊसपक्षी : शांत, चलाख शहरी शिकारी

णसांप्रमाणे घुबडेदेखील आयुष्यभर एकाच जोडीदाराबरोबर राहतात.

tvlogसमोरून भुतिया पांढरा रंग, पंखांचा कसलाही आवाज न करता रात्रीच्या वेळी सतत शिकारीत व्यग्र राहण्याची सवय यामुळे घुबडाला एक गूढ वलय प्राप्त झाले आहे. त्यातूनच या पक्ष्याविषयी एक अनामिक भीती अनेकांच्या मनात असते आणि कदाचित यामुळेच अनेकदा पक्षीमित्रांना ‘आमच्या इथे घुबड आले आहे ते पकडून न्या’ असे फोन येतात किंवा ‘दुर्मीळ घुबड शहरात सापडले’ अशा बातम्याही येतात.
प्रत्यक्षात मात्र कोठीचे घुबड हे जंगलातून वगैरे येत नसते. ते इतर पक्ष्यांप्रमाणे आपल्या आजूबाजूला शहरातच राहते. कोठीचे घुबड हा साधारण ३६ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. पाठीकडून सोनेरी-बदामी आणि राखाडी रंगाचा, त्यावर काळ्या-पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेला, पोटाकडे मुख्यत्वे रेशमी पांढरा रंग, त्यावर बदामी रंगाचा भाग आणि गडद तपकिरी रंगाचे ठिपके असतात. याचे डोके गोलसर आकाराचे, काहीसे माकडासारखे असते. चेहऱ्याचा रंग पांढरा-बदामी आणि चोच बाकदार असते. नर-मादी दिसायला सारखेच असतात. ध्रुव प्रदेश आणि अतिवाळवंटी भूभाग सोडल्यास कोठीचे घुबड उर्वरित संपूर्ण जगभर आढळते. शास्त्रीय भाषेत यांना ‘टायटो अल्बा’ असे म्हणतात. यातील टायटो हा शब्द ग्रीक भाषेतील टुटो या शब्दावरून आलेला आहे. याचा अर्थ घुबड असाच होतो, तर अल्बा हा शब्द लॅटिन भाषेतील अल्बस शब्दावरून आलेला आहे. त्याचा अर्थ पांढरा असा होतो.
युरोपमध्ये घुबडाला विद्येचे प्रतीक मानले जाते. पश्चिम बंगालमध्ये घुबडाला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. या धर्तीवर पुरोगामी महाराष्ट्राने घुबडाला किमान स्वच्छतेचे प्रतीक तरी मानायला हरकत नव्हती, पण दुर्दैवाने या पक्ष्याला आपल्या महाराष्ट्रात मात्र अपशकुनी मानले जाते. खरे तर उंदरांच्या संख्येवर ताबा ठेवून घुबड एक प्रकारे माणसाला मदतच करत असते. बकाल शहरे, वाढत्या कचराकुंडय़ा या उंदरांची संख्या वाढवतात व त्या उंदरांना खाण्यासाठी घुबडे येतात. तिक्ष्ण कान, समोरील बघू शकणारे मोठे डोळे, लांब ताकदवान पंजे घुबडांना रात्रीच्या आकाशातील एक यशस्वी शिकारी बनवतात. हे पक्षी निशाचर असून दिवसा झाडाच्या ढोलीत, रिकाम्या किंवा पडक्या घरात बसून राहतात.
माणसांप्रमाणे घुबडेदेखील आयुष्यभर एकाच जोडीदाराबरोबर राहतात. नोव्हेंबर महिना हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. या सुमारास मादीला आकर्षित करण्यासाठी नर रात्रीच्या वेळी विविध हवाई कर्तबे करतो, आवाज करतो, पंखांनी टाळ्याही वाजवतो. जुन्या-पडक्या इमारतींच्या कोनाडय़ात, झाडांच्या ढोलीत जमिनीपासून उंच ठिकाणी काडय़ा वापरून घुबडे घरटी तयार करतात. घरटय़ांजवळ दिवसा सावली येऊ शकेल अशा ठिकाणी ते बांधलेले असते.
एकच घरटे वर्षांनुवर्षे वापरण्याची सवय या पक्ष्यांना असते. मादी एकावेळी पांढऱ्या रंगाची, गोलसर ४ ते ७ अंडी  देते. पिल्लांचे संगोपन नर-मादी दोघे मिळून करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2015 12:23 am

Web Title: article about bird owl
Next Stories
1 वाचक वार्ताहर : सॅटिस नेमके कोणासाठी?
2 वाचकांशी सलोखा जपणारे ग्रंथालय
3 इन फोकस : पर्यावरणाचा विध्वंस
Just Now!
X