28 October 2020

News Flash

सुंदर मी दिसणार!

लाइफस्टाइल आणि फॅशन ब्लॉगर प्रिया आडिवरेकर हिने नवरात्रीच्या सणासाठी काही खास ब्युटी आणि मेकअप टिप्स दिल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

करोनामुळे आपण सारेच घरात अडकलो आहे. जरी बाजारपेठा सुरू झाल्या तरी सणांच्या काळात नेहमीसारखे तयार होऊन मिरवणे हे यंदा नाहीच. पण तरी नटण्यामुरडण्याच्या हौसेला मुरड घालण्याचे कारण नाही.  म्हणूनच लाइफस्टाइल आणि फॅशन ब्लॉगर प्रिया आडिवरेकर हिने नवरात्रीच्या सणासाठी काही खास ब्युटी आणि मेकअप टिप्स दिल्या आहेत.

करोनाकाळात घरात बसून सगळेच वैतागले. पण घरात आहोत म्हणून सतत घरच्या कपडय़ांत वावरण्याऐवजी कधीतरी छान तयार होऊनही मूड मस्त करता येतो. बाहेर जरी जायचे नसले तरी घरात बसूनही सण साजरा करता येतोच. बाहेर जायचे नाही, गरबा खेळायचा नाही म्हणून छान दिसायचे नाही, फॅशनकडे पाहायचेच नाही, असे थोडेच आहे. उलट मी तर म्हणेन की, घरातच बसायचे आहे आणि फक्त ऑनलाइन दिसायचे आहे तर काही नवे फॅशन ट्रेंडही बिनधोक फॉलो करता येतील.

दागिन्यांविषयी बोलायचे झाल्यास सध्या सगळ्यात जास्त इन असलेला प्रकार म्हणजे हेडगिअर्स, अर्थात शिरोभूषणे. याआधी कानातले, गळ्यातले, कं बरपट्टे, पायातील पैंजण, अंगठय़ा, बांगडय़ा या सगळ्यासोबत डोक्यावर, केसांत घालायचा दागिना म्हणून फक्त बिंदी असायची. लग्नसमारंभात वगैरे मांग-टिक्का किंवा भांगेतील साखळी यांसारखे दागिने वापरले जात. पण सध्या मात्र हेडगिअर्सची चलती आहे. हेवी हेडगिअर्स, त्यावर साधेसे कानातले डूल घालून तुम्ही छान तयार होऊ शकता. पारंपरिक मांग टिक्कासुद्धा हेडगिअर म्हणून वापरता येईल. रंगीत, चंदेरी, सोनेरी, मण्यांचे, साखळ्यांचे अशा अनेक प्रकारातील हेडगिअर बाजारात आहेत. ऑनलाइन खरेदीही करता येईल. हेडगिअरमुळे तुमचा फेस्टिव्ह लुक परिपूर्ण होईल.

कानातील झुमके  हे प्रत्येकीकडे असतातच. हे झुमके  तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ड्रेसवर वापरू शकता. इतके च काय, जीन्सच्या जॅकेटवर, कोटावरसुद्धा झुमके घालू शकता. इंडोवेस्टर्न लुकमधील हा एक नवा ट्रेंड आहे. अ‍ॅक्सेसरीजमध्ये बेल्ट अर्थात कमरपट्टे हा उत्तम प्रकार आहे.  साडी घागऱ्यासारखी ड्रेप करून त्यावर मोठ्ठासा बेल्ट लावल्यास एक वेगळा लुक मिळू शकतो. बोहेमियम लुकसुद्धा सध्या इन आहे. त्यामध्ये निरनिराळे प्रयोग करायलाही खूप वाव असतो.

प्रिया सांगते, खरेतर खरेदीसाठी सध्या चांगला मोसम आहे, अनेक चांगल्या ब्रँड्सनी ऑनलाइन खरेदीवर सवलती दिल्या आहेत. त्याचा नीट अभ्यास करून खरेदी के ल्यास भरमसाठ पैसे खर्च न करताही सुंदर ड्रेसेस घेता येतात. नवीन खरेदी करायची नसेल तर मिक्स अँड मॅच करून सुंदर लुक मिळवता येईल. जॅके ट, घागरा, जीन्स ब्लाऊज, ओढणी असे निरनिराळे ड्रेसेस मिक्स अँड मॅच करून वेगळा लुक मिळवता येईल.

मेकअपच्या बाबतीत सध्या डोळ्यांच्या मेकअपला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. कलरफुल आइज हे विशेष फॉर्मात आहेत. या निमित्ताने यल्लो, रेड, ब्ल्यू असे थोडेसे बोल्ड रंगही मेकअप पॅलेटमध्ये दिसतायत. त्याचबरोबर जेल लायनर आणि हायलायटर्स इन आहेत.

बाहेर कुठे जायचे नाही म्हणून घरात त्याच त्या कंटाळवाण्या कपडय़ांत बसायचे असा काही नियम नाही. उलट सणांच्या निमित्ताने घरातही छान तयार होऊन बसल्यास ऑफिसचे काम करताना ऑफिससारखेच तयार होऊन बसल्या मनाची मरगळही जरा दूर होईल आणि उत्साह वाढेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 2:06 pm

Web Title: article on some special beauty and makeup tips for navratri festival abn 97
टॅग Navratra
Next Stories
1 उत्ताना मही कामाख्या!
2 रानफुलांची आरास
3 मूलकारण विश्वाची.. आदिमाता युगायुगांची!
Just Now!
X