सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही आवाहन
पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्शपट घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेतंर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यावर्षी शहरातील दीड दिवसांच्या तब्बल १६ हजार ०३३ गणेश मुर्तींचे विसर्जन झाले तर महापालिकेच्या गणेशमुर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकुण ६२२ गणेश मुर्तींचे महापालिकेच्यावतीने विधीवत विसर्जन करण्यात आले. दरम्यान गेल्या वर्षीच्या १५ हजार ८२८ च्या तुलनेत यावर्षी संख्येत वाढ झाली असून हि संख्या १६ हजार ३३ पर्यंत पोहोचली आहे. नागरिकां प्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुध्दा या तलावामध्ये गणेशमुर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था केली होती. या व्यवस्थे अंतर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन नीळकंठ ग्रीन (टिकुजिनी वाडी) येथे कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. तर पारसिक रेती बंदर अणि कोलशेत बंदर येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणेश मुर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावर्षी महापलिकेने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवित शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या दीड दिवसांच्या गणपतीचे कृत्रीम तलावामध्ये वाजत गाजत विधिवत विसर्जन केले. यावर्षी मासुंदा तलावामध्ये या वर्षी २१६० गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. रायलादेवी येथील दोन कृत्रीम तलावात गेल्यावर्षीच्या २२४३ गणेश मुर्तींच्या तुलनेत यावर्षी २३२९ गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. उपवन आणि नाळकंठ ग्रीन येथील दोन कृत्रीम तलावामध्ये गेल्यावर्षी २६१५ तुलनेत यावर्षी २७५३ श्रींच्या मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.