उल्हासनगर शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षावर अंबरनाथ शहरात झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी सायंकाळी शिवमंदिर मार्गावर मनसे उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. जागेच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.