20 September 2020

News Flash

अणुऊर्जा केंद्रातील वाफेच्या आवाजाने घबराट

आठ ते दहा किलोमीटर परिसरात आवाज

सयंत्रातील वाफेचे हवेत उत्सर्जन; आठ ते दहा किलोमीटर परिसरात आवाज

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाजवळील ८ ते १० किलोमीटर परिसरात शनिवारी रात्री मोठा आवाज आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा आवाज कशासंदर्भात आहे याबाबत माहिती घेण्यासाठी अनेकांनी पोलीस ठाण्यामध्ये दूरध्वनी केले. मात्र अणुऊर्जा प्रकल्पाच्या संयंत्रातून वाफ हवेत सोडण्यात आल्याने हा आवाज झाल्याचे सांगण्यात आले. मात्र वाफ सोडण्यापूर्वी त्याबाबत परिसरातील ग्रामस्थांना आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना काहीही कल्पना देण्यात आली नव्हती.

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प-४ येथील अणुभट्टीतून शनिवारी रात्री ९.३०च्या सुमारास संयंत्रामधील वाफ हवेत सोडण्यात आली. संयंत्रातील या उच्च दाबाच्या वाफेमुळे मोठय़ा प्रमाणात आवाज सर्वत्र घुमू लागला. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिक भीतीने घराबाहेर पडले. पोलिसांकडे याबाबत चौकशी केल्यानंतर अणुऊर्जा प्रकल्पातून उच्च दाबाची वाफ सोडण्यात आल्याचे समजले.

ग्रामस्थांना माहिती नाही!

अणुऊर्जा प्रकल्पाकडून स्थानिक पोलीस ठाण्यात प्रकल्पातून उच्च दाबाची वाफ सोडणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र स्थानिक ग्रामपंचायत व नागरिकांना तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना याबाबत कोणतीही कल्पना न दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसून आले होते. याबाबतची माहिती स्थानिकांना देणे गरजेचे होते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील युनिट-४मध्ये संयंत्रातील उच्च दाबाची वाफ वातावरणात सोडण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान काही संयंत्रांच्या चाचण्याही करण्यात आल्या. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली होती.      – ए. पी. फडके,जनसंपर्क अधिकारी, अणुऊर्जा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 1:30 am

Web Title: atomic energy project
Next Stories
1 वसईत स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन
2 ‘केळवे बीच फेस्टिव्हल’मध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल
3 मानीव अभिहस्तांतरणाचे भिजत घोंगडे
Just Now!
X