News Flash

वाहतूक पोलिसांवरील हल्ले सुरूच

ठाण्यात मद्यधुंद चालकाकडून फरफट

आरोपी योगेश भामरे

ठाण्यात मद्यधुंद चालकाकडून फरफट

मुंबईतील वाहतूक पोलीस कर्मचारी विलास शिंदे यांचा जीवघेण्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्घटना ताजी असतानाच वाहतूक पोलिसाला धडक देऊन त्याला तब्बल अर्धा किमी अंतरापर्यंत फरफटत नेण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी ठाण्यात घडला. संबंधित वाहतूक पोलिसाने गाडीच्या बोनेटला घट्ट पकडून ठेवल्याने तो वाचला. याप्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद चालकाला अटक केली असून आहे.

तीन हात नाका येथे बंदोबस्तावर असलेले वाहतूक पोलिसांवरील हल्ले सुरूच

पोलीस हवालदार नरसिंग महापुरे (४७) यांनी विरुद्ध दिशेने (नो-एन्ट्री) भरधाव वेगाने येणारी कार पाहिली. त्यांनी कारचालकाला थांबण्याचा इशाराही केला. परंतु मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या योगेश भामरे (२७) याने महापुरे यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत थेट त्यांच्या अंगावरच गाडी नेली. या प्रकाराने हादरलेल्या महापुरे यांनी जिवाच्या आकांताने गाडीचे बोनेट घट्ट धरून ठेवले. चालकाने त्यांना अर्धा किमी अंतरापर्यंत फरफटत नेले. गाडी वेडीवाकडी फिरवत महापुरे यांना पाडण्याचा प्रयत्नही चालकाने केला. महापुरे यांचा सहकारी मनीषसिंग याच्या उजव्या पायावरूनही चालकाने गाडी नेली. त्यानंतर नागरिकांनी व इतर वाहनचालकांनी हे थरारनाटय़ थांबवत मद्यधुंद अवस्थेतील योगेशला गाडीतून बाहेर काढून त्याला पोलिसांच्या हवाली केले. योगेशकडे वाहनचालकाचा परवाना नसल्याचे चौकशीत आढळून आले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नौपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. योगेशचा सहकारी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला.

राज ठाकरेंकडून विचारपूस 

ठाण्यातील ही घटना समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नरसिंग महापुरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांची विचारपूस केली.

केवळ नशिबाने वाचलो..

नो-एन्ट्रीतून भरधाव येणाऱ्या गाडीला थांबण्याचा इशारा दिला, परंतु त्याने थेट गाडी अंगावरच आणली बोनेट पकडले नसते तर त्याने मला चिरडले असते. केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचलो, अशी प्रतिक्रिया  नरसिंग महापुरे यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2016 2:08 am

Web Title: attacks on traffic police
Next Stories
1 कोंडाणे गैरव्यवहारप्रकरणी सातजणांविरुद्ध गुन्हे
2 ठाण्यात वाहतूक पोलिसाला फरफटत नेणाऱ्या मद्यपी गाडीचालकाला लोकांचा चोप
3 कोकणचा भार ठाण्यावर
Just Now!
X