News Flash

अतुल जाधवचे राष्ट्रीय स्तरावर सुवर्णयश

अतुल याची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.

विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाचा विज्ञानाचा व राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये तृतीय वर्षांत असणारा अतुल जाधव हा दिल्ली येथे भरलेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये एनआयसी कॅम्पतर्फे आयोजित १०० मीटर अ‍ॅथेलीट स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून प्रथम आला.

अतुल हा एनसीसीचा विद्यार्थी प्रथम अमरावती येथे भरलेल्या आयजीसी कॅम्पमध्येही शंभर मीटरच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून प्रथम आला होता. त्यानंतर त्याची आरडीसी कॅम्पसाठी दिल्लीला निवड झाली आणि दिल्लीमधील कॅम्पमध्ये त्याने ही अद्वितीय कामगिरी दाखवली. यावर्षी ऑलिम्पिक गेम्समध्ये बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आता राष्ट्रीय स्तरावरील हे सुवर्णपदक म्हणजे महाविद्यालयासाठी भूषणावह बाब आहे, असे उद्गार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी पेजावर यांनी काढले आणि अतुलला शुभेच्या देण्यात आल्या. अतुल याची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 12:31 am

Web Title: atul jadhav win gold medal
Next Stories
1 भ्रष्ट अधिकाऱ्यांना तडाखा!
2 भाईंदरमधील धोकादायक इमारतींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष
3 वसईच्या अवलियाची दुचाकीवरून जगभ्रमंती!
Just Now!
X