कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षांचे ऑनलाइन परवाने देण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर उमेदवाराने अत्यावश्यक कागदपत्रे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विहित वेळेत व तारखेला सादर करणे बंधनकारक आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार नाईक यांनी सांगितले.

ऑनलाइन अर्जासाठी प्रक्रिया शुल्क १०० रुपये, सेवा केंद्रामार्फत अर्ज करण्यासाठी १२० रुपये आकारण्यात येणार आहेत. पात्र उमेदवाराला ऑन लाइन भरलेला अर्ज ७ जानेवारीपर्यंत कल्याण आरटीओ कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. परवान्यासाठी पात्र झालेल्या उमेदवारांची निवड करण्यात येईल. त्यानंतर सोडत पद्धतीने १२ जानेवारी किंवा अन्य तारखेला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

अत्यावश्यक कागदपत्रांचे पुरावे आरटीओ कार्यालयात जमा केल्याशिवाय कोणाही उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे नाईक यांनी सांगितले.