12 July 2020

News Flash

भाजप पदाधिकाऱ्यांकडून रिक्षाचालकाला बेदम मारहाण

मारहाणीसंबंधीचा हा सगळा प्रकार परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील जानकी हॉटेल येथे शनिवारी रात्री रिक्षा उभी करण्यावरून दोन संघटनांच्या रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. भाजप रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिस्पर्धी रिक्षा संघटनेतील चालकाचे अपहरण करून त्यांना अज्ञातस्थळी नेले. तेथे त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत रिक्षाचालक गंभीर झाले जखमी असून त्यांच्यावर मुंबईतील के. ई. एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात भाजप रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मारहाणीसंबंधीचा हा सगळा प्रकार परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. शेलार नाका येथे बाबासाहेब कांबळे हे रिक्षाचालक राहतात. शनिवारी रात्री बाबासाहेब यांना जानकी हॉटेलजवळील रिक्षा वाहनतळावरून काही रिक्षाचालकांनी बोलावून त्यांना अज्ञात स्थळी नेल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली. यानंतर तात्काळ बाबासाहेब यांचा भाऊ सिद्धार्थ आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. त्या वेळी बाबासाहेब रक्तबंबाळ आणि बेशुद्धावस्थेत शेलार नाका येथील रस्त्यावर पडले होते. भाजप रिक्षा संघटनेचे पदाधिकारी दत्ता माळेकर, रवी माळेकर आणि त्यांच्या सहा कार्यकर्त्यांनी आपल्याला रिक्षा वाहनतळावरून अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप बाबासाहेब यांनी केला आहे. जखमी अवस्थेत बाबासाहेब यांना के. ई. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी दत्ता माळेकरसह त्याच्या इतर साथीदारांविरोधात मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून संजय चेचे, कृष्णा कल्याणकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2019 3:57 am

Web Title: autorickshaw driver abducted beaten up by bjp union members zws 70
Next Stories
1 काळय़ापिवळय़ा रिक्षाचा आता चारचाकी साज
2 रेल्वेचा खांब रस्त्यावर?
3 डोंबिवलीत वाघाचे कातडे जप्त
Just Now!
X