22 September 2020

News Flash

फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपवरील मैत्री धोक्याची!

पोलिसांनी हे अभियान सुरू करून तरुणाईमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

 

पोलिसांचे तरुणाईमध्ये जागृती अभियान

‘हर एक फ्रेंड जरुरी होता है..’ अशी जाहिरात तरुणाईला भुलवत आहे. मात्र सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे कितीे धोकादायक आहे, हे अलीकडील अनेक घटनांवरून सिद्ध होत आहे. यामुळे ‘हर एक फ्रेंड जरुरी नही होता’ असे अभियान आता पोलिसांनी राबविण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच नालासोपारा आणि विरार येथे दोन तरुणी फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपवरील मैत्रीला भुलल्या आणि त्यांच्या अनोळखी मित्रांनी त्यांच्यावर बलात्कार केला. अशा घटनांच्या वाढत्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी हे अभियान सुरू करून तरुणाईमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

सध्याचा काळ सोशल मीडियाचा आहे. फेसबुकवरून अनोळख्या व्यक्तींशी मैत्री केली जाते. मैत्री आणि प्रेम या तारुण्यसुलभ भावना असल्याने तरुण वर्ग मित्र बनवत असतात. फेसबुकवर मैत्री करून नंतर प्रेमाच्या जाळ्यात फसवले जाते तसेच इतर मार्गाने आर्थिक फसवणूक केली जाते. अनेक मुलींवर फेसबुक मित्राने बलात्कार केल्याच्या घटना घडल्या आहेत. अल्पवयीन मुली त्याला जास्त प्रमाणात बळी पडत आहेत. त्यामुळे फेसबुकवर मैत्री करताना सावध राहा, असे आवाहन पालघर जिल्हय़ाच्या पोलीस अधीक्षिका शारदा राऊत यांनी केले आहे. मुंबई पोलिसांनी ‘हर फ्रेंड जरुरी होता है’ या प्रसिद्ध जाहिरातीच्या वाक्याला एन्काऊंटर करत ‘हर एक फ्रेंड जरुरी नही होता’ असे वाक्य असलेले भित्तिपत्रक काढले आहे. जागोजागी, महाविद्यालय, हॉटेल्स आदी ठिकाणी लावून त्याद्वारे जनजागृती केली जात आहे.

फेसबुकवर आपण प्रायव्हसी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या सर्व बाबी आपण फेसबुकवर टाकत असतो, त्यामुळे त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. फेसबुकवर काहीच गोपनीय राहात नाही, असे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते आणि पोलीस उपायुक्त डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. फेसबुकवर अनेक जण बोगस ओळख असलेले प्रोफाइल बनवून मैत्री करत असतात. त्यांचा उद्देश फसवणूक हाच असतो. मुंबईसह देशभरात फेसबुकवर ओळख झालेल्या मित्राकडून बलात्कार करण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवडय़ात विरार येथे राहणाऱ्या एका तरुणीची फेसबुकवर ओळख झालीे. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर त्या तरुणाचे लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. नालासोपारा येथील एक महाविद्यालयीन तरुणीदेखील व्हॉटसअ‍ॅपवर आलेल्या मेसेजला बळी पडली. त्या आरोपी तरुणाने व्हॉटसअ‍ॅपवर चॅटिंग करत तिच्याशी मैत्री केली आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2015 12:49 am

Web Title: awareness campaign by police
टॅग Awareness,Campaign
Next Stories
1 लग्नाचा नकार जिवावर बेतला..
2 परमारप्रकरणी नगरसेवकांच्या कोठडीत वाढ
3 शिवसेना नगरसेवक हत्येप्रकरणी चौघे अटकेत
Just Now!
X