26 February 2021

News Flash

पैशांच्या पावसाचे आमिष दाखवून बलात्कार

जादूटोण्याने कोटय़वधी रुपयांचा पाऊस पाडण्याची बतावणी करत भोंदूबाबाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली

| July 31, 2015 04:15 am

जादूटोण्याने कोटय़वधी रुपयांचा पाऊस पाडण्याची बतावणी करत भोंदूबाबाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून यामध्ये पीडित मुलीच्या पित्याचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीचा पिता, भोंदूबाबा यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
भिवंडी येथील नागाव परिसरात पीडित मुलगी राहत असून तिचे वडील हातमाग कामगार आहेत. तिच्या कुटुंबाला आर्थिक चणचण जाणवत होती. त्यामुळे अरुण घाडगे आणि आनंद पन्ना दोघांनी तिच्या वडिलांना सलीम अन्सारी या बाबाची माहिती दिली. हा बाबा जादूटोण्याने पैशांचा पाऊस पाडतो. मात्र, त्यासाठी लांब केसांच्या आणि अंगावर डाग नसलेल्या अविवाहित मुलीची गरज आहे. या मुलीशी बाबा निकाह करेल आणि पाऊस पडल्यानंतर तलाक होईल, अशी बतावणी दोघांनी केली. कोटय़वधी रुपयांचा पाऊस पाडण्यासाठी त्याला स्वत:च्या मुलीला तयार करण्यास सांगितले. पैशांच्या पावसामुळे गरिबी दूर होणार असल्याने त्याने पीडित मुलीला तयार केले.
ठरल्याप्रमाणे निकाह झाला आणि पाऊस पडण्यासाठी विधी सुरू करण्यात आला. मात्र, वेळ निघून गेल्याने दुसऱ्या दिवशी पाऊस पाडू, असे सांगत सलीम याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलगी घरी निघून गेली. या घटनेनंतर दोन ते तीन दिवस सलीम आलाच नाही. त्यामुळे तिने सलीमचा शोध घेऊन तलाक घेतला. तरीही सलीम तिला पत्नी म्हणून राहण्यासाठी धमक्या देत होता. ही बाब तिने मामा आणि भावाला सांगताच त्यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी बलात्कार, पोक्सा आणि जादूटोणाविरोधी कायद्यानुसार शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित मुलीचा पिता, भोंदूबाबा सलीम, मित्र अरुण घाडगे, आनंद पन्ना, मौलाना सय्यद रेहाना रजा आदींना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.डी. शिंदे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 4:15 am

Web Title: baba rape on woman in bhiwandi
टॅग : Woman
Next Stories
1 शिर्डीवारीचा ताण ठाण्यावर
2 अखिलेश पाटीलची हत्या चुलतभावाने केल्याचे उघड
3 ठाण्याची विद्यादानाची परंपरा
Just Now!
X