21 September 2020

News Flash

बदलापूर, अंबरनाथमध्ये टक्केवारीचे अर्धशतक

पालिका निवडणुकीत अंबरनाथमध्ये ४८.८१ तर बदलापूरमध्ये ५५.६ टक्के मतदान झाले असून किरकोळ हाणामाऱ्या तसेच बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. अंबरनाथमध्ये महात्मा गांधी विद्यालयात

| April 23, 2015 04:00 am

पालिका निवडणुकीत अंबरनाथमध्ये ४८.८१ तर बदलापूरमध्ये ५५.६ टक्के मतदान झाले असून किरकोळ हाणामाऱ्या तसेच बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. अंबरनाथमध्ये महात्मा गांधी विद्यालयात तर बदलापूरमध्ये आदर्श महाविद्यालयात गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.
कुळगांव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बदलापुरात एकूण सरासरी ५५.६ टक्के मतदान झाले आहे. मतदानाचे दिवशी शहरात काही प्रभागात तणावाचे व किरकोळ हाणामारीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यावर साडेनऊपर्यंत १३.६ टक्के मतदान झाले होते. यात प्रामुख्याने मुंबईला जाणाऱ्या चाकरमानी वर्गाने मतदानासाठी हजेरी लावली. दुपारी दीड वाजेपर्यंत ३९.३० टक्के मतदान झाले. शेवटच्या दोन तासांत काही प्रभागांत दगडफेकीचे व हाणामारीचे प्रकार घडल्याचे समजते आहे. सरतेशेवटी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी ५५.६ टक्के मतदान झाले. ४२ प्रभागातील १५० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून आज सकाळी १० वाजता येथील आदर्श महाविद्यालय येथे मतमोजणीस सुरुवात होणार आहे.अंबरनाथमध्येही सकाळी दोन तासच मतदारांचा अधिक उत्साह होता. तुलनेने दुपारनंतर तो कमी झाला. प्रभाग क्र. ३० गांधीनगर येथील राष्ट्रवादीच्या उमेदवार ग्रेसी सिद्धार्थन यांच्यावर अज्ञात इसमांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना उमेदवार अब्दुल शेख यांचे समर्थक विशाल ढगे यांना महात्मा गांधी शाळेसमोर काही अज्ञात इसमांनी मारहाण झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 4:00 am

Web Title: badlapur ambernath civic bodies voting
Next Stories
1 ठाण्यात दूधकोंडी सुरूच
2 ठाणे क्लब : काय होते प्रकरण?
3 विस्तारित महामुंबई कोणाची?
Just Now!
X