News Flash

रोहित वेमुलाला बदलापूरकरांची श्रद्धांजली

रोहितच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती लावून त्याला श्रद्घांजली वाहण्यात आली.

हैदराबादमधील पीएच.डी.चा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येनंतर सर्वत्र वातावरण तापले असतानाच बदलापुरातही मेणबत्ती मोर्चाचे आयोजन करून रोहितला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बदलापूर युथ रेजिमेंटच्या पुढाकाराने बदलापुरात आयोजित करण्यात आलेल्या या मेणबत्ती मोर्चात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व विशेषत: तरुण मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

रोहित वेमुला या हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री ८.०० वाजता मेणबत्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बदलापूर पूर्वेकडील कात्रप येथील घोरपडे चौकातून या मेणबत्ती मोर्चाला सुरुवात झाली. कात्रपमधून उड्डाण पूलमार्गे पश्चिमेकडे बाजारपेठ ते रमेशवाडी असे मार्गक्रमण करून भगवती रुग्णालयासमोरील उद्यानात या मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी रोहितच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती लावून त्याला श्रद्घांजली वाहण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 12:31 am

Web Title: badlapur people give tributes to rohith vemula
Next Stories
1 ‘आयसिस’शी संबंधित १४ जणांना अटक, मुंब्र्यातूनही एकजण ताब्यात
2 कळवा ‘व्यापारी क्षेत्रा’ला सीआरझेडचा अडसर!
3 कल्याण-डोंबिवली पालिकेतील १६ कर्मचारी निलंबित
Just Now!
X