21 March 2019

News Flash

संतुलित आहाराला योगसाधनेची जोड आवश्यक

प्रेक्षकांकडून ओंकार करवून घेऊन आशिष फडके यांनी एकाग्रता वाढवण्याचे तंत्र सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आरोग्यमान भव’ परिसंवादातील सूर; पहिल्या दिवशी श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद; आजही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे वेगवान झालेल्या मानवी जीवनास उत्तम आरोग्याची साथ मिळेल तेव्हास अधिक काळ निरोगी आणि कृतीशील राहता येईल. मात्र, यासाठी संतुलित आहार आणि शास्त्रोक्त योग अत्यावश्यक आहेत, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ कार्यक्रमात शुक्रवारी दिला.

ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्यमान भव’ या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीच्या परिसंवादासाठी केवळ ठाणेच नव्हे तर, घाटकोपरपासून बदलापूपर्यंत आणि बोरिवलीहूनही श्रोत्यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही असाच परिसंवाद होणार असून त्यात डॉ. अद्वैत पाध्ये, डॉ. आशिष फडके आणि डॉ. अरुणा टिळक हे मार्गदर्शन करतील आणि उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरेही देतील.

व्यस्त जीवनशैलीत दुर्लक्षीत झालेल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे, मात्र हे संवर्धन कशाप्रकारे करावे याविषयीचा सल्ला जाणून घेण्यासाठी लोकसत्ता आयोजीत ‘आरोग्यमान भव परिसंवाद आणि प्रदर्शन’  या कार्यक्रमात नागरीकांनी  पहिल्या दिवशी भरगोस प्रतिसादात मोठी उपस्थिती दर्शवली.  ‘अनियमीत वेळेमुळे जेवण वेळवर होत नाही, अशावेळेस काय करू?’ , ‘मुले व्यवस्थित आहार घेत नाहीत, त्यांच्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा?’ असे आहारासंबंधित विविध प्रश्न श्रोत्यांनी  ‘घरच्या घरी पौष्टिक आहार’ या विषयावर मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. शिल्पा जोशी यांना विचारले.  ‘महिलांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर संवाद साधताना डॉ. अद्वैत पाध्ये यांनी नैराश्य दूर करण्यासाठी स्त्रियांनी कोणते उपाय केले पाहिजेत यावर मार्गदर्शन केले. ‘योग आणि आर्युवेद’ या विषयावर आपली मते मांडून डॉ.आशिष फडके यांनी उपस्थितांना योगाचे महत्व पटवून दिले. यावेळी डॉ. आशिष फडके यांनी श्रोत्यांकडून काही बैठे योगाचे प्रकार करून घेतले. यावेळी उपस्थितांनी प्राणायमाचे प्रकार केले. प्रेक्षकांकडून ओंकार करवून घेऊन आशिष फडके यांनी एकाग्रता वाढवण्याचे तंत्र सांगितले.

आजची सत्रे व मार्गदर्शक

* महिलांचे मानसिक आरोग्य

– डॉ. अद्वैत पाध्ये

* योग आणि आयुर्वेद

– डॉ. आशिष फडके

* घरच्या घरी पौष्टिक आहार

– डॉ. अरुणा टिळक

कधी?

शनिवार, १६ मार्च २०१९

सकाळी दहा ते दुपारी तीन

कुठे ?

टिप टॉप प्लाझा,

एलबीएस मार्ग, ठाणे (प.)

प्रवेशिका कुठे मिळणार?

या कार्यक्रमासाठी २० रुपये प्रवेश शुल्क असून प्रवेशिका कार्यक्रम स्थळी उपलब्ध होतील.

प्रायोजक

‘आरोग्यमान भव’ या कार्यक्रमाचे वास्तुरविराज, पितांबरी प्रोडक्टस् प्रा.लि. सहप्रायोजक असून पॉर्वड बाय पार्टनर तन्वी हर्बल आणि हिलिंग पार्टनर ब्रम्हविद्या आहेत. बँकिंग पार्टनर डीएनएस बँक आहे. हेल्थ इव्हेंट सर्पोटेड बाय आशापुरा ग्लोबल प्रोजेक्ट आणि मँगो व्हिलेज,गुहागर आहेत. या परिसंवादाचे ट्रॅव्हल पार्टनर स्पंदन टूर्स प्रा.लि. असून हार्ट केअर पार्टनर माधवबाग हे आहेत.

First Published on March 16, 2019 12:16 am

Web Title: balanced diet requires a combination of yoga