26 September 2020

News Flash

बांगलादेशी महिलेला दहा वर्षे तुरुंगवास

रुबी सिकदर मुन्शी (४०) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

कल्याण : बांगलादेशातून एका तरुणीला भिवंडीत आणून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका महिलेला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी एस. पी. गोंधळेकर यांनी दोषी ठरवून तिला १० वर्षे तुरुंगवास आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सबळ पुराव्यांचा अभाव आणि संशयाचा लाभ देत न्यायालयाने या प्रकरणातील तीन जणांची निदरेष सुटका केली.

रुबी सिकदर मुन्शी (४०) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. ती भिवंडीतील हनुमान टेकडी येथे राहत होती. ती मूळची बांगलादेशातील सातखिरा जिल्ह्यातील रहिवासी आहे. अलमगीर, अफजल सिद्दिकी, रामदेवी डोडामनी अशी सुटका झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाचा तपास, न्यायालयात कागदपत्र दाखल करण्यात भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र दळवी, सोमनाथ मुंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष सरकारी वकील उज्ज्वला मोहोळकर यांनी न्यायालयाला सांगितले, मार्च २०१४ मध्ये एका सामाजिक संस्थेला हनुमान टेकडी येथे एका तरुणीला एक महिला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती मिळाली होती. या तरुणीला बांगलादेश येथून आणण्यात आले आहे. पीडित तरुणीने नकार दिल्यावर तिला बेदम मारहाण करणे, सर्वागावर सिगारेटचे चटके देणे, तिचे दात पाडणे असे अघोरी प्रकार करण्यात येत होते. एक दिवस सकाळीच पोलीस, सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तरुणी असल्याच्या ठिकाणी छापा टाकला. तेथे तरुणीसह रुबी मुन्शी व इतर आरोपींना पोलिसांनी पकडले. तरुणीची परिस्थिती मारहाणीने चिंताजनक झाल्याने तिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 1:09 am

Web Title: bangladeshi woman imprisoned for ten years
Next Stories
1 कामकाजासाठी ‘झिरो नंबर’
2 ठाणे खाडीत रंगीबेरंगी पाहुण्यांची किलबिल
3 जीवनगाण्यांवर रसिकांचा ठेका ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’
Just Now!
X