News Flash

बँक ग्राहकांचे पैसे परस्पर काढले!

फसवणूक झालेल्यांमध्ये निवृत्त कर्मचारी, व्यावसायिक यांचा सर्वाधिक समावेश आहे.

बँक ग्राहकांचे पैसे परस्पर काढले!
फाइल फोटो (फोटो सौजन्य: रॉयटर्स)

डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावरील आयडीबीआय बँकेच्या शाखेतून मागील तीन दिवसांपूर्वी सुमारे ३० ग्राहकांच्या बचत, निवृत्ती, चालू खात्यामधून ग्राहकांना अंधारात ठेवून रकमा काढून घेण्यात आल्या आहेत. ग्राहकांना आपल्या मोबाइल क्रमांकावर रकमा काढल्याचे लघुसंदेश आल्यावर हा प्रकार उघडकीला आला आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये निवृत्त कर्मचारी, व्यावसायिक यांचा सर्वाधिक समावेश आहे.

खात्यामधून पैसे गेलेल्या तक्रारदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी लेखी तक्रारी केल्या आहेत. बँकेनेही अशा ग्राहकांकडून परताव्यासाठी अर्ज भरून घेतले आहेत. सोमवारी रात्री उशिरा हा पैसे काढून घेण्याचा प्रकार घडला. त्यानंतर दोन दिवस बँकेला सुट्टी होती. काही ग्राहकांनी आपण बँकेच्या एटीएममधून कोणताही व्यवहार केला नाही. आपला गोपनीय क्रमांक कुणाला दिला नाही तरी आपल्या खात्यामधून रक्कम काढली गेली, अशी विचारणा गुरुवारी बँकेत जाऊन केली. त्यावेळी अशाप्रकारे सुमारे ३० ग्राहकांच्या खात्यामधून रकमा काढून घेण्यात आल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

‘बँकेतून परस्पर पैसे काढले गेल्याची तक्रार ३० खातेदारांनी केली आहे. बँकेसमोरील एटीएममधून हा प्रकार घडला असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपींनी एटीएममध्ये स्क्रिनिंग स्कॅनिंग यंत्र बसविले असावे. त्या आधारे ऑनलाइन पध्दतीने ग्राहकांचे पैसे काढले गेले असावेत. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे’, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 12:51 am

Web Title: bank customers withdraw money from each other abn 97
Next Stories
1 पोलिसांच्या कुटुंबियांचे लसीकरण
2 ठाण्यात ‘प्राणवायू’ची चिंता मिटणार
3 ठाण्यात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा
Just Now!
X