10 July 2020

News Flash

खासगी छायाचित्रांच्या आधारे इन्स्टाग्रामवरून खंडणी

वसईच्या माणिकूपर पोलीस ठाण्यात राहाणाऱ्या एका अल्पवयीन जोडप्यांचे प्रेमसंबंध होते.

छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन एक लाखांची मागणी; वसईमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

वसई : एका जोडप्यांची खासगी आणि आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत इन्स्टाग्रामवरून खंडणी मागितल्याचे प्रकरण वसईत उघडकीस आले आहे. माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. इन्स्टाग्रामवरून खंडणी मागितल्याचे हा पहिलाच गुन्हा वसईत दाखल झाला आहे.

वसईच्या माणिकूपर पोलीस ठाण्यात राहाणाऱ्या एका अल्पवयीन जोडप्यांचे प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी या तरुणाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका अनोळखी अकाऊंटवरून संदेश आला. या संदेशात या जोडप्याची एक आक्षेपार्ह चित्रफीत टाकून ही चित्रफीत इन्स्टाग्रामवर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली होती. जर हे थांबवायचे असेल तर ९० हजार रुपये खंडणी देण्याची मागणी त्याने केली. विशेष म्हणजे ही खंडणी बिटकॉईनच्या माध्यमातून त्याने मागितली होती.

फिर्यादी तरुणाने तडजोड करून ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र ही चित्रफीत आणि छायाचित्रे त्या अनोळखी व्यक्तीकडून गैरवापर होण्याची त्याला भीती होती. त्यामुळे शेवटी त्याने माणिकूपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३८४ अन्वये खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

खासगी छायाचित्रे काढताना काळजी घ्या!

या प्रकरणात फिर्यादी जोडप्यांनी काढलेली खासगी छायाचित्रे आणि चित्रफीत लिक झाली आणि अज्ञात व्यक्तीच्या हाती सापडली. त्या आधारे तो ब्लॅकमेल करत आहे. अशी खासगी छायाचित्रे आणि चित्रफिती काढणे धोकादायक असल्याने ती काढू नये, असे पोलिसांनी सांगितले. मोबाइल हरवला, तो दुरुस्तीला दिला तर मोबाइलमध्ये असलेल्या खासगी छायाचित्रांचा गैरवापर केला जातो. तसेच मोबाइल हॅक करूनही अशी छायाचित्रे पळवली जातात, असे पोलिसांनी सांगितले.

‘इन्स्टाग्राम’शी संपर्क

माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी इन्स्टाग्रामला संपर्क केला असून संबंधित खात्याची तांत्रिक माहिती मागवली आहे. हे खाते बनावट आहे. मात्र तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला पकडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. अशाप्रकारे इन्स्टाग्रामवरून ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी इन्स्टाग्राम कंपनीशी संपर्क करून तपासकामात मदत मागितली आहे. खंडणी मागणाऱ्याचे खाते बनावट आहे. मात्र इन्स्टाग्रामने काही तांत्रिक माहिती दिलेली आहे. त्याद्वारे आम्ही आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत.    – राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पो.  निरीक्षक, माणिकपूर पोलीस ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 12:31 am

Web Title: based on private photos ransom from instagram
Next Stories
1 अवघ्या सहा वर्षांत पूल धोकादायक
2 उघडय़ा गटारात पडून वृद्धाचा मृत्यू
3 आधी भूमिपूजन, मग स्थगिती
Just Now!
X