24 January 2020

News Flash

पत्नी डान्सबारमध्ये करायची काम; पतीने केली हत्या, मृतदेहाचे केले तुकडे

सबिना ही डान्सबारमध्ये काम करायची. ही बाब हमीदला खटकत होती. यावरून दोघांमध्ये खटके देखील उडायचे.

प्रतिकात्मक छायाचित्र

पत्नी डान्सबारमध्ये काम करत असल्याने नाराज झालेल्या पतीने तिची हत्या केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हमीद अन्सारी याला अटक केली आहे.

नारपोली येथे सबिना सरदार ही महिला तिचा पती हमीद अन्सारी याच्यासोबत राहत होती. सबिना ही डान्सबारमध्ये काम करायची. ही बाब हमीदला खटकत होती. यावरून दोघांमध्ये खटके देखील उडायचे.

शुक्रवारी ठाणे ग्रामीण पोलिसांना सोनाले गावाजवळ निर्जनस्थळी एका पिंपात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. महिलेच्या मृतदेहाचे आठ तुकडे करून पिंपात टाकण्यात आले होते. ठाणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी सर्वप्रथम पिंप कुठून खरेदी करण्यात आला होता याचा शोध घेतला. पिंप तारापूर येथील कंपनीत तयार करण्यात आला होता आणि त्याची विक्री भिवंडीत करण्यात आली होती.

भिवंडीतील दुकानदाराकडून हा पिंप एका गोदामात विकण्यात आला. तिथून हा पिंप भंगाराच्या दुकानात विकण्यात आला. पोलिसांचे पथक अखेर भंगार विक्रेत्याकडे पोहोचले. भंगार विक्रेत्याने हा पिंप एका व्यक्तीने विकत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी दुकानाजवळील सीसीटीव्ही आधारे त्या व्यक्तीची ओळख पटवली असता पिंप घेणारा व्यक्ती हमीद असल्याचे उघड झाले. या आधारे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांना हमीदने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

First Published on April 24, 2019 9:07 am

Web Title: bhiwandi wife works at dance bar husband killed her chopped up body
Next Stories
1 दिवावासीयांचा पैसा पाण्यात!
2 नोकरीच्या बहाण्याने ४० जणांना गंडा
3 डान्सबारमध्ये काम करणाऱ्या महिलेची हत्या
Just Now!
X