‘चिऊताइ्र्र, चिऊताई. दार उघड’.. लहानपणी चिऊताईला साद घालणारी ही कविता सर्वानाच आठवत असेल. मात्र हल्लीची मुले ही कविता म्हणत नसावीत. कारण इमारतींच्या जंगलात चिमणी आहेच तरी कुठे? सध्या चिमणी हा पक्षी क्वचितच दिसतो. सध्याच्या धावपळीच्या दिवसात चिमण्यांचे काय चालले आहे हे पाहण्यासाठीही आपल्याला वेळ नसतो. सकाळी सकाळी उठवून आपल्याला ‘गुड मॉर्निग’ करणारा चिमण्यांचा चिवचिवाट आता नाहीसाच होत आहे.. मात्र तरीही हा पक्षी अजून तग धरून आहे. आमचेही एक जग असते, हे सांगण्यासाठी.. २० मार्च रोजी ‘जागतिक चिमणी दिन’ आहे.. त्यामुळेच चिमण्यांच्या या जगाविषयी..