उपमहापौरपद साई पक्षाकडे; ठाणे जिल्ह्य़ात प्रथमच भाजपची शिवसेनेवर मात

शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या उल्हासनगर महापौर निवडणुकीत भाजपच्या मीना आयलानी बहुमताने विजयी झाल्या. उपमहापौरपदी साई पक्षाचे जीवन ईदनानी यांची निवड झाली असून पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या प्रयत्नांनंतरही शिवसेनेला चमत्कार घडविता आला नाही.

Kolhapur, Hatkanangle, election battle,
कोल्हापूर, हातकणंगलेत चुरस वाढली
Thane Lok Sabha, OBC Bahujan Party candidate,
ठाणे लोकसभेच्या रिंगणात ओबीसी बहुजन पार्टीचा उमदेवार
atul londhe
 ‘नाना पटोले यांच्या गाडीवरील हल्ल्याची सखोल चौकशी करा’; पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व निवडणुक आयोगाला पत्र
Hatkanangale election
कोल्हापूर : राहुल आवाडे हातकणंगलेच्या रिंगणात; मशाल हाती घेणार ?

निवडणुकीत भाजपला ३२, तर शिवसेनेला २५ जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी आवश्यक असलेला ४० नगरसेवकांचा आकडा जुळविण्यासाठी साई पक्षाच्या १२ नगरसेवकांना भाजपने आपल्या तंबूत घेतले होते. साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या दरबारात हजर करत त्यांचा पाठिंबा मिळवला होता. त्यानंतरही एकनाथ िशदे भाजपला धक्का देण्यासाठी प्रयत्नशील होते. शिवसेनेने साई पक्षाच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न केल्याने रवींद्र चव्हाण आणि एकनाथ िशदे यांच्यात बाचाबाचीचा प्रसंग घडला होता.

गोंधळ, सभात्याग, घोषणाबाजी 

कोकण विभागीय आयुक्तांकडून साई पक्षाची गट मान्यता रद्द करण्यात आल्याने गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरात नगरसेवकांच्या फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून भाजप आणि साई पक्षाच्या नेत्यांनी आपल्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले होते. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर जवळपास २५  मिनिटे सभागृहात उशिरा आल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कल्याणकर यांनी सभागृहात येताच दिलगिरी व्यक्त करत निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली. मात्र साई पक्षाच्या गट मान्यतेच्या मुद्दय़ावर पुन्हा शिवसेना नगरसेवकांनी गदारोळ सुरूकेला. या वेळी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी शिवसेना नगरसेवकांना सुनावले. ही सभा नियमानुसार नसून प्रकरण न्यायप्रविष्ट असताना निवड कशी होऊ  शकते, असा आक्षेप घेत शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला.