News Flash

अ‍ॅम्फोटेरेसीन-बी इंजेक्शनचा काळाबाजार

पोलिसांनी त्यांच्याकडून १४ इंजेक्शन जप्त केले.

ठाणे : म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी महत्त्वाच्या असलेल्या अ‍ॅम्फोटेरेसीन-बी या इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. निखील पवार, अमरदीप सोनावणे आणि प्रग्णेशकुमार पटेल अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. निखील आणि प्रग्णेशकुमार हे औषध निर्मिती कंपनीमध्ये काम करतात. तर अमरदीप हा मुंबई महापालिकेत क्लीनअप मार्शल म्हणून काम करतो. पोलिसांनी त्यांच्याकडून १४ इंजेक्शन जप्त केले. तिघेही हे इंजेक्शन मूळ किमतीच्या दुप्पट दराने विक्री करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. अ‍ॅम्फोटेरेसीन-बी या इंजेक्शनची दुप्पट दराने विक्री सुरू असल्याची माहितीकापूरबावडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने  सापळा रचून निखील आणि अमरदीप या दोघांना अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 1:23 am

Web Title: black market of amphotericin b injection akp 94
Next Stories
1 उद्धव ठाकरेंनी प्रताप सरनाईकांना मातोश्रीत लपवलं आहे; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
2 टाळेबंदीत खारफुटींची बेसुमार कत्तल
3 विकासकामांसाठी कोटय़वधींचे कर्ज?
Just Now!
X