News Flash

मोठी बातमी! डहाणूमध्ये फटाक्यांच्या कंपनीत भीषण स्फोट; ५ ते १० किमीपर्यंतचा परिसर हादरला

कंपनीत मोठ्या प्रमाणात कामगार अडकले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत

पालघरच्या डहाणू तालुक्यातील डेहणेपळे येथे एका फटाके बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट

पालघरच्या डहाणू तालुक्यातील डेहणेपळे येथे एका फटाके बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की आजुबाजूची गावेही मोठ्या प्रमाणात हादरली आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, सुमारे पाच ते १० किलोमीटर परिसरातील घरांना मोठे धक्के जाणवले.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत वेल्डिंगचं काम सुरू होतं, त्याचदरम्यान आग लागल्याने हा स्फोट झाला आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात कामगार अडकले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाना आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नसून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू झाले आहे.

“स्फोटात दहा जण भाजले असून एक जण गंभीररीत्या जखमी आहे. जखमींना डहाणू आशागड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलासह तहसीलदार व संबंधित खात्यांचे अधिकारी घटनेची चौकशी करण्यासाठी दाखल झाले आहेत,” अशी माहिती तहसीलदारांना दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 12:24 pm

Web Title: blast in dahanu fireworks factory in palghar sgy 87
Next Stories
1 आयआयटीमार्फत कोपरी पुलाची तपासणी
2 किरकोळ बाजारात कांदा ३५ रुपये किलो
3 पालिकेच्या अभियंत्याचे निलंबन; कंत्राटदारास अटक
Just Now!
X