सर्वसामान्यांना संवाद, संपर्क आणि व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ पुरवणाऱ्या ‘फेसबुक’ने आता देशात आरोग्यविषयक जनजागृतीपर उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात रुग्णांना रक्ताचा पुरवठा तातडीने व्हावा, यासाठी फेसबुकवरून विशेष मोहीम राबवली जात असून त्यासाठी देशातील चार रक्तपेढय़ांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे महापालिका आणि ब्लडलाइन संस्थेतर्फे संयुक्तपणे संचालित रक्तपेढीचाही समावेश करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक जनजागृतीसाठी ‘फेसबुक’वर एक नवीन पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. यामध्ये वापरकर्त्यांना आरोग्यविषयक सल्ले देण्यात येतील. त्यात रक्तदानाचाही मुद्दा असणार आहे. या विभागात प्रत्येक वापरकर्त्यांला आपला रक्तगट नमूद करणे अनिवार्य फेसबुक’वर एक नवीन पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. करण्यात येणार आहे. ही नोंदणी झाल्यानंतर एखाद्या रुग्णाला तातडीने रक्ताची गरज लागल्यास त्याच्या विभागातील रक्तदाते आणि रक्तपेढय़ांचा संपर्क क्रमांक पुरवण्यात येईल. एखाद्या गरजूला वेळेत रक्त मिळवून देणे हा या मोहिमेमागचा हेतू आहे. भारतात फेसबुकचे सर्वाधिक वापरकर्ते आहेत, त्यामुळे मोहिमेतील पहिल्या टप्प्यात भार ‘फेसबुक’वर एक नवीन पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. ताचा समावेश करण्यात आला आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील फेसबुक कंपनीच्या दहा जणांच्या पथकाने यासंदर्भात भारतात सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी या पथकाने ठाण्यातील खोपट येथील ब्लडलाइन रक्तपेढीला भेट दिली. या भेटीत त्यांनी रक्तपेढीतील कामकाज पाहिले. त्यानंतर फेसबुकच्या मुंबईतील कार्यालयात संबंधितांची बैठक झाली. त्यात या मोहिमेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत असणारी ब्लडलाइन रक्तपेढी ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर काम करते. उत्तम आणि सुयोग्य कामगिरीच्या निकषावर या रक्तपेढीची निवड करण्यात आल्याचे संचालकांनी सांगितले.

निवड करण्यात आलेल्या रक्तपेढय़ा

  • ठाणे महानगरपालिका आणि ब्लडलाइन संयुक्त रक्तपेढी- ठाणे
  • जे जे महानगर रक्तपेढी- भायखळा
  • सैफी हॉस्पिटल रक्तपेढी- चर्नी रोड
  • सद्गुरू रक्तपेढी- कोपरखैरणे (नवी मुंबई)

योजना काय?

  • या योजनेत सहभागी फेसबुक वापरकर्त्यांला आरोग्याविषयी फेसबुकच्या माध्यमातून सल्ले दिले जातात.
  • या आरोग्य जनजागृतीच्या विभागात रक्तदान नावाचा एक पर्याय असणार आहे. या पर्यायाद्वारे सुरुवातीला फेसबुक वापरकर्त्यांने आरोग्य जनजागृती पर्यायात स्वत:चा रक्तगट नमूद करणे अनिवार्य आहे. एखाद्या रुग्णाला तातडीने रक्ताची आवश्यकता असेल तर त्या परिसरातील रक्तपेढय़ा तसेच रक्तदात्यांचे क्रमांक त्यांना कळविण्यात येतील.