करोनाच्या भीतीमुळे नागरिकांची रक्तदानाकडे पाठ

वसई : वसई-विरार शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. करोनाच्या भीतीमुळे नागरिक रक्तदान करण्यास पुढे येत नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
महायुतीचं सरकार टिकणार नाही? अजित पवार गटातील आमदाराच्या वक्तव्याने खळबळ; भाजपा नेत्याला म्हणाले, “मी सुरूंग लावून…”
australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी
decision to create an independent family is right or wrong
स्वतंत्र संसार थाटण्याचा निर्णय : समंजस की असमंजस?

वसई-विरार शहरात एकूण सरला, साथीया आणि विजया असा एकूण तीन रक्तपेढ्या आहेत. वसई-विरार महापालिकेची स्वत:ची रक्तपेढी नाही. त्यामुळे पालिकेने साथीया रक्तपेढीशी करार केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठ्याप्रमाणात रक्ततुटवडा निर्माण झालेली आहे. सहज उपलब्ध होणारे बी पॉझिटिव्हसारखे रक्तदेखील उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी डॉक्टरांनी केल्या आहेत. गरोदर स्त्रिायांना प्रसूतीसाठी, कर्करोग तसेच थॅलिसिमियाच्या रुग्णांना रक्ताची गरज लागते. याशिवाय अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध असणे गरजेचे असते. मात्र करोनाच्या काळात शहरात रक्ततुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. मी गेली २५ वर्षे वसईत व्यवसाय करतोय. मात्र एवढी रक्तटंचाई कधी जाणवली नव्हती, असे नालासोपारा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मांजलकर यांनी सांगितले. रक्त वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अप्रिय दुर्घटना घडण्याची भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली आहे.

आमच्याकडे एरवी रक्तचा पुरेसा साठा असतो. परंतु करोनाकाळात रक्तदान करण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याने रक्ततुटवडा निर्माण झाल्याचे वसईच्या सरला रक्तपेढीने सांगितले. आमच्या रक्तपेढीत आता कुठलेच रक्त उपलब्ध नाही. आमच्याकडे रक्त घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनाच आम्ही रक्तदान करायला सांगतो, असे सरला रक्तपेढीच्या डॉ. नीता रवी यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात रक्तदान होणे गरजेचे आहे. नागरिकांनी न घाबरता रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन सुषमा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नितीन ठाकूर यांनी केले. पालिकेने आमच्याशी करार केला आहे. मात्र रक्तदातेच मिळत नसल्याने अवस्था बिकट झाली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर रक्तपेढीला कुलूप लावावे लागेल, असे साथीया रक्तपेढीचे संचालक डॉ. विजय महाजन यांनी सांगितले. वसईतील डॉक्टरांच्या संघटनेने तसेच वसईच्या रुग्णालयांच्या सहकार्याने वसईतील रुग्णांना रक्त मिळेल, अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे, असे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी सांगितले.

यंग स्टार ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन

वसईत पूर्वी रक्ताची उपलब्धता असायची. वसईतून मोठ्या प्रमाणावर मुंबईत रक्त पुरवले जात होते. मात्र करोनाकाळात सर्वत्र रक्ततुटवडा निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या विविध संस्था आणि रुग्णालयांनी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना रक्त पुरविण्यासाठी मदत मागितली होती. त्यानुसार बहुजन विकास आघाडी आणि यंग स्टार ट्रस्टतर्फे रक्तदान शिबीर आयोजित करून रक्तसंकलन केले जात आहे. करोनाच्या काळात आम्ही विविध रुग्णालयांशी संपर्क साधून रक्तदान शिबिरांमार्फत ६ हजारांहून अधिक बाटल्या रक्त उपलब्ध करून दिल्याची माहिती यंग स्टार ट्रस्टचे समन्वयक आणि पक्षाचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी सांगितले.

करोनाच्या भीतीने नागरिक रक्तदान करत नसल्याने रक्ताची टंचाई निर्माण झालेली आहे. परंतु पालिका रुग्णालयांना आतापर्यंत रक्ताअभावी कुठलीही अडचण आलेली नाही. नागरिकांनी रक्तदान करायला हवे.

-डॉ. तब्बसूम काझी, वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महापालिका