News Flash

मुरबाडजवळ जंगलात दोन तरुणींचे मृतदेह

याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बदलापूर : मुरबाड तालुक्यातील पोटगावच्या जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोन तरुणींचे मृतदेह आढळून आले आहेत.

कल्याण तालुक्यातील केळणी हे गाव पोटगावपासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहे. या केळणी गावातील या दोन तरुणी (वय १८ आणि १९) रानात जातो असे सांगून शुक्रवारी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र या घरी परतल्या नाही. सोमवारी पोटगावातील काही तरुण जंगलातील रानभाज्या गोळा करण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना दोन तरुणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी  मुरबाड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या दोन्ही तरुणींचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. दोन्ही तरुणींनी क्षुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तरी शवविच्छेदन अहवालातून त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 3:47 am

Web Title: bodies of two young women found in the forest near murbad zws 70
Next Stories
1 ‘मुंब्रा बाह्यवळण’ चार महिने बंद?
2 पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी
3 बदलापुरात आरोग्य कर्मचारी कपात
Just Now!
X