26 October 2020

News Flash

बेपत्ता सनदी लेखापालाचा मृतदेह आढळला

याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती

(प्रतिकात्मक छायाचित्र)

कल्याण : गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ठाण्यातील सनदी लेखापालाचा मृतदेह शनिवारी टिटवाळा येथील रेल्वे रुळाजवळ आढळल्याने खळबळ उडाली. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

ठाण्याच्या चरई भागातील रहिवाासी असलेले सागर देशपांडे मुंबईतील एका प्रसिद्ध ट्रॅव्हल कंपनीत सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या सात दिवसांपासून ते बेपत्ता होते. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शनिवारी दुपारी टिटवाळा येथील रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह लोहमार्ग पोलिसांना आढळून आला. नौपाडा पोलिसांनी हा मृतदेह सागर देशपांडे यांचा असल्याची खातरजमा केली. घटनास्थळापासून दीड किमी अंतरावर त्यांचे वाहन सापडले आहे, अशी माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीकी शार्दूल यांनी दिली. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 2:07 am

Web Title: body of a missing chartered accountant found zws 70
Next Stories
1 सुंदर मी दिसणार!
2 उत्ताना मही कामाख्या!
3 रानफुलांची आरास
Just Now!
X