22 September 2020

News Flash

घोडबंदरमधील वाघबीळ खाडीत तरुणाचा मृतदेह

वाघबीळ खाडीकिनारी सकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी आलेल्या एका नागरिकाला तरुणाचा मृतदेह आढळला

प्रतिनिधिक छायाचित्र

 

घोडबंदर येथील वाघबीळ खाडीकिनारी शनिवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळला. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसून, आत्महत्येचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वाघबीळ खाडीकिनारी सकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी आलेल्या एका नागरिकाला तरुणाचा मृतदेह आढळला. त्याने याबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह खाडीतून भागातून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 1:43 am

Web Title: body of a young man in waghbil bay in ghodbandar abn 97
Next Stories
1 १२ तासात होणार २५ हजार वडे तळण्याचा विक्रम
2 वसईकरांचे पाणी अशुद्ध?
3 आणखी एक तलाव मरणपंथाला
Just Now!
X