News Flash

विरारमध्ये आर्थिक परिस्थितीला कंटाळून बॉडीबिल्डरची आत्महत्या

अली सालेमानी याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली

विरार पूर्वे येथे एका बॉडीबिल्डरने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. अली सालेमानी असं या ३५ वर्षीय बॉडीबिल्डरचं नाव आहे. अली सालेमानी याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक परिस्थितीला कंटाळून आली सालेमानी याने जीवन संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

विरार येथील शिवलीला अपार्टमेन्टमध्ये राहणाऱ्या बॉडीबिल्डर अली सालेमानी याने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आर्थिक परिस्थितीसमोर हतबल होऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचललं. त्याने तीन वेळा वसई श्री, एकदा दहिसर श्री आणि ज्युनियर महाराष्ट्र श्री स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला होता. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून त्याने अनेक तरुणांना शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले होते. मात्र अनेक दिवसांपासून त्याची आर्थिक परिस्थिती खालावली होती. अखेर कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याच्या मागे दोन मुली, बायको आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 1:27 pm

Web Title: bodybuilder commit suicide in virar sgy 87
Next Stories
1 पहिल्याच दिवशी AC ची ऐशीतैशी, लोकल २५ मिनिटं उशिरा; स्थानकावर तुफान गर्दी झाल्याने प्रवाशांची तारांबळ
2 केंद्रीय अर्थसंकल्प जाणून घ्या सहजपणे!
3 कळवा-ऐरोली उन्नत मार्ग सुकर!
Just Now!
X