18 November 2019

News Flash

भोंदूबाबाकडून महिलेला १५ लाखांचा गंडा

घाबरलेल्या महिलेने या दोघांना विविध प्रकारच्या विधीसाठी तब्बल १५ लाख रुपये दिले.

(संग्रहित छायाचित्र)

ठाणे : मुलाच्या आयुष्याला धोका असून वाईट शक्ती त्याला मारू शकते, असे सांगून भोंदूबाबा राहुल मोरे आणि त्याचा साथीदार गणेश साळुंखे यांनी एका महिलेला तब्बल १५ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी सोमवारी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

फसवणूक झालेली महिला ठाण्यातील एका उच्चभ्रू संकुलात राहत असून त्यांचे कळवा येथील मनीषानगर परिसरात ब्यूटी पार्लरचे दुकान आहे. सुमारे वर्षभरापूर्वी त्यांच्या मुलाचा कार अपघात झाला होता. त्यामुळे त्या सतत चिंतेत असत. यादरम्यान त्यांची ओळख भोंदूबाबा राहुल मोरे आणि त्याचा साथीदार गणेश साळुंखे याच्याशी झाली. ‘तुमच्या मुलाच्या आयुष्यात फार मोठा धोका असून त्याला वाईट शक्ती केव्हाही मारू शकतात’, असे या दोघांनी त्या महिलेला सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने या दोघांना विविध प्रकारच्या विधीसाठी तब्बल १५ लाख रुपये दिले. मात्र आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी राहुल मोरे आणि गणेश साळुंखे यांच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

First Published on June 19, 2019 4:11 am

Web Title: bogus godmen cheated woman for 15 lakh rupees
Just Now!
X