News Flash

वसईत बोगस फार्मसिस्ट सक्रिय

परराज्यातील अनेक जण बनावट प्रमाणपत्र बनवून काम करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

औषध विक्रेत्या संघटनांची कारवाईची मागणी; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे न देण्याचे आदेश

वसईतल्या औषध विक्रीच्या दुकानांमध्ये बोगस फार्मसिस्टचा सुळसुळाट झाल्याचा आरोप औषध विक्रेत्यांच्या संघटनांनी केला आहे. अशा बोगस फार्मसिस्टना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. याशिवाय तरुणाईला नशेपासून परावृत्त करण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कुठलीही औषधे न देण्याच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांचे पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी संघटनेतर्फे दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे.

मीरा रोड ते डहाणूदरम्यान १५०० औषध विक्रीची दुकाने आहेत. वसई, नालासोपारा आणि विरारमध्ये साडेसहाशेहून अधिक दुकाने आहेत. औषध विक्रीच्या दुकानांमध्ये फार्मसिस्ट ठेवणे शासनातर्फे बंधनकारक करण्यात आलेले आहे. औषधे देताना त्याचा दुरुपयोग होऊ नये किंवा चुकीची औषधे दिली जाऊ नयेत हा यामागे उद्देश होता. परंतु यामुळे अनेक बोगस फार्मसिस्ट कार्यरत झाल्याचा आरोप केमिस्ट परिवार ऑफ  न्यूज या संघटनेने केला आहे. परराज्यातील अनेक जण बनावट प्रमाणपत्र बनवून काम करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

अन्न व औषध प्रशासनालाही मान्य

फार्मसी प्रमाणपत्रामध्ये अनेक अनियमितता असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने मान्य केले आहे. परराज्यातून फार्मसीची नोंदणी केल्यानंतर महाराष्ट्रात तशी नोंदणी करावी लागते. आम्ही केवळ तशी नोंदणी झालेली आहे की नाही ते तपासतो. परंतु ते बोगस आहे की नाही ते तपासता येत नाही. इंडियन फार्मसी काउन्सिलने याबाबत पुढाकार घेऊन फार्मसी महाविद्यालय, त्यांचे व्यवहार आणि कार्यपद्धतीवर अंकुश घालायला हवे, असे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

अगदी ६० हजार रुपयांत फार्मसिस्टचे प्रमाणपत्र बनवून मिळते. तसे प्रमाणपत्र बनवून देणारे अनेक दलालही सक्रिय आहेत. सरकारने या सर्व फार्मसिस्टच्या प्रमाणपत्रांची तपासणी करायला हवी. अन्यथा चुकीची औषधे दिली जाऊन त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे वसई-विरार शहरात बोगस डॉक्टर सक्रिय आहेत, त्याचप्रमाणे बोगस फार्मसिस्टसुद्धा सक्रिय आहेत.

दीपशंकर पाटील, औषध विक्रेते संघटनेचे अध्यक्ष.

परराज्यातून बोगस प्रमाणपत्र घेऊन अनेक जण येत असतात. तशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आम्ही कारवाई करत असतो. नुकतेच मुलुंड येथे अशा चार बोगस फार्मसिस्टना आम्ही पकडून दिले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जगन्नाथ शिंदे, सदस्य, महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 12:48 am

Web Title: bogus pharmacist active in vasai
Next Stories
1 आरोग्य आणि संवादाची प्रभातफेरी!
2 बदलापूर नगरपालिकेचा आज ‘स्वच्छतेचा जागर’
3 कोंडीमुक्त कल्याणसाठी नाल्यावर वाहनतळ
Just Now!
X